घरमहाराष्ट्रनाशिकब्रम्हगिरी परिसरातील इको टुरिझम, कुशावर्त तिर्थाचेही सुशोभिकरण लवकरच

ब्रम्हगिरी परिसरातील इको टुरिझम, कुशावर्त तिर्थाचेही सुशोभिकरण लवकरच

Subscribe

नाशिक विभाग जिल्हा नियोजन समिती बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, जिल्हाधिकार्‍यांनी मागितला १,२७५ कोटींची अतिरिक्त निधी

नाशिक जिल्हयात ब्रम्हगिरी येथे इको टुरिझम आणि कुशावर्त येथील सुशोभिकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नाशिक येथे केली. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत नाशिक येथे आयोजीत जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकित जिल्हाधिकारयांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हयांसाठी केंद्रिय योजना व जनसुविधांसाठी १२७५.१९ कोटींची अतिरिक्त निधी मागणी करण्यात आली. मंजुर करण्यात येणार्‍या वाढीव निधीचा उपयोग आवश्यक बाबींसाठी करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजीत या बैठकित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, विधनसभा उपाध्यक्ष विजय औई, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. विभागासाठी सन २०१९ ः२०२० साठी सर्वसाधारण योजनांसाठी नाशिक विभागाचा १२४१ कोटींचा आराखडा तयार केला आहे. याचे सादरीकरण प्रत्येक जिल्हयाच्या जिल्हाधिकार्‍यांनी सादरीकरण केले. सर्वसाधारण वार्षिक योजनेंंतर्गत वाढीव मागणी असलेला नाशिक जिल्हयाचा ५७४.७८ कोटी, धुळे २५२.४६, नगर ९७५.२ आणि नंदुरबार जिल्हयासाठी १२१.७८ कोटीचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला. आवश्यक बाबींसाठी वाढीव तरतूद देण्याई येईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले. निर्धारित नियतव्ययापेक्षा अधिक निधी देण्यात आल्यानंतर त्याचा उपयोग रोजगार, आरोग्य संस्था आणि अंगणवडी बांधकामासाठी करण्यात यावा. विकास आराखडा तयार करतांना अभ्यासपूर्ण नियोजन करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. पुर्वी मंजूर असलेल्या अंगणवाडयांना चालू वर्षाप्रमाणे वाढीव साडेआठ लाखाचा निधी मान्य करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले. बैठकिच्या प्रांरभी अहदमनगर वनविभागाने विविध योजनांची माहीती देण्यासाठी तयार केलेल्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. या बैठकिसाठी विभागातील चारही जिल्हयांतील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -