घरदेश-विदेशक्रिप्टोकरन्सी सीईओचा मृत्यू, अब्जावधी अडकले

क्रिप्टोकरन्सी सीईओचा मृत्यू, अब्जावधी अडकले

Subscribe

ऑनलाईन तिजोरीत शेकडो कोटी रुपये आहेत. चावीसारखा एक पासवर्ड आहे. मात्र हा पासवर्ड फक्त एकाच व्यक्तीकडे आहे आणि तो व्यक्ती हयात नाही.जिच्या नावावर त्याने ही संपत्ती केली आहे,त्याच्या पत्नीकडेही त्याचा पासवर्ड नाही. एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच ही कथा. मृत्यू पावलेल्या या ३० वर्षीय व्यक्तीचे नाव आहे गेराल्ड कॉटन. त्याच्या कंपनीचे नाव आहे क्वॉड्रिगासीएक्स.

डिसेंबर २०१८मध्ये आतड्यांशी संबंधित एका आजारामुळे गेराल्डचा मृत्यू झाला. भारतातील अनाथ मुलांसाठी गेराल्डला भारतात एक अनाथाश्रम सुरू करायचा होता. त्या निमित्ताने तो भारतात आला होता असे सांगितले जात आहे. गेराल्डच्या अकाउंटवर १९० मिलियन डॉलर (सुमारे १३०० कोटी रुपये) किमतीची क्रिप्टोकरन्सी लॉक केलेली आहे. परंतु, त्याला चावीसारखा एक पासवर्ड आहे. मोठमोठे सिक्युरिटी एक्स्पर्ट देखील ही करन्सी अनलॉक करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर अनेक कहाण्या

या विषयावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा सर्व प्रकार फसवणुकीचा तर नाही ना, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. गेराल्डला आतड्यांचा गंभीर रोग झाला असताना, जिथे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, अशा भारतात तो कसा आला, असे प्रश्नही लोक इंटरनेटवर विचारू लागले आहेत. गेराल्ड भारतात गेला होता हेही खरे कशावरून असेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ‘रेडइट’वर लोक विचारत आहेत. गेराल्डचा मृत्यू भारतातील जयपूर येथे झाल्याचे मला एका भारतीय मित्राने कळवले आहे, असेही एकाने लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -