घरक्रीडाअजित घोष स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा

अजित घोष स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा

Subscribe

मुंबई पोलीस जिमखाना संघाने कामत मेमोरियल क्रिकेट क्लबला ३८ धावांनी पराभूत करून अजित घोष स्मृती महिला टी-२० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात मुंबई पोलीस जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत १ बाद १६६ धावांचे लक्ष्य उभारले. सारिका कोळी (४६) आणि रुचिता बुळे (नाबाद ८०) या सलामीच्या फलंदाजांनी ११२ धावांची भागीदारी रचली. सारिकाने ३८ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ४६, तर रुचिताने केवळ ६४ चेंडूत नाबाद ८० धावा फटकावताना ९ चौकार ठोकले.

या आव्हानाचा पाठलाग करताना कामत मेमोरियल संघाने १० धावातच दोन बळी गमावले, पण तनिशा गायकवाड (३७) आणि काजल उपाध्याय (४८) यांनी तिसर्‍या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचून संघाच्या आशा वाढवल्या. तनिशा बाद झाल्यानंतर कृतिका कृष्णकुमारने काजलच्या साथीने ३४ धावांची भर घातली, पण कामत मेमोरियलला २० षटकांत ५ बाद १२८ धावांचीच मजल मारता आली. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून रुचिता बुळे हिची निवड करण्यात आली.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

मुंबई पोलीस जिमखाना : २० षटकांत १ बाद १६६ (सारिका कोळी ४६, रुचिता बुळे नाबाद ८०, श्वेता कलपथी नाबाद १९) विजयी वि. कामत मेमोरियल स्पोर्ट्स सी.सी. : २० षटकांत ५ बाद १२८ (तनिशा गायकवाड ३७, काजल उपाध्याय ४८, कृतिका कृष्णकुमार २१).

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू – कृतिका कृष्णकुमार (कामत मेमोरियल)
स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज – वैभवी राजा (कामत मेमोरियल)
स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज – निधी घरत (मुंबई पोलीस)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -