घरदेश-विदेशनिर्दोष सिद्ध होऊनच राजकारणात येईन - रॉबर्ट वढेरा

निर्दोष सिद्ध होऊनच राजकारणात येईन – रॉबर्ट वढेरा

Subscribe

रॉबर्ट वढेरा हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे असून, सध्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.

प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर, त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या राजकारणातील प्रवेशावर अनेक सवाल उपस्थित केले जात होते. दरम्यान, रॉबर्ट वढेरा यांची आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु असताना, प्रथमच त्यांनी आपल्या राजकराणतील प्रवेशावर भाष्य केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलतेवेळी वढेरा यांनी सांगितलं की, ‘ज्यावेळी या प्रकरणात मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल तेव्हाच मी राजकारणात प्रवेश करेन’ असं सांगितलं. ‘माझं निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मी राजकारणात येणार नाही’ या त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता नाकारली जात नाही. रॉबर्ट वढेरा हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे असून, सध्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.

रॉबर्ट वढेरांनी २००५ ते २०१० या पाच वर्षांत लंडनमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली होती. खरेदीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. यासंबधीच त्यांची चौकशी केली जात आगे. वढेरा यांनी काही दिवसांपूर्वीच राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. जनतेची सेवा करण्यासाठी आपणही मोठी भूमिका बजावणार असल्याचं म्हणत त्यांनी राजकारणात येण्याबाबतचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. याच धर्तीवर वढेरा म्हणाले की, ‘‘मी या देशात राहतो. ज्यांनी या देशाला लुटले ते देशाबाहेर पळून गेले. त्यांचे काय ?. मी भारत सोडून कधीच जाणार नाही.’ याचसोबत ‘माझी चौकशी पूर्ण होईपर्यंत मी सक्रीय राजकारणात देखील येणार नाही हा माझा शब्द आहे’, अशीबी भूमिका त्यांनी मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -