घरमहाराष्ट्रयुतीच्या समन्वय समितीपासून खडसेंना ठेवले दूर

युतीच्या समन्वय समितीपासून खडसेंना ठेवले दूर

Subscribe

लोकसभा निवडणुकीत युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्तीतजास्त समन्वय ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विविध मतदारसंघांसाठी समन्वय समित्यांची स्थापना केली. मात्र या समित्यांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दूर ठेवण्यात आल्याचे पहायला मिळत आहे.

सत्तेत असूनही मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये मिळत असलेल्या वागणुकीबद्दल अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. आता देखील असाच काहीसा प्रकार भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत झाल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्तीतजास्त समन्वय ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विविध मतदारसंघांसाठी समन्वय समित्यांची स्थापना केली. मात्र या समित्यांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दूर ठेवण्यात आल्याचे पहायला मिळत आहे.

अशी आहे समन्वय समिती

  • सिंधुदूर्ग-रत्नागिरी, रायगड, मावळ या रायगड जिल्ह्यातल्या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी शिवसनेकडून सुभाष देसाई तर भाजपकडून रवींद्र चव्हाण समन्वय समिती नेमण्यात आली आहे.
  • कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडीसाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपाचे रवींद्र चव्हाण यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.
  • पुणे, बारामती, शिरूर, सोलापूर, माढा, मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी (रायगडमधल्या विधानसभा मतदारसंघ वगळून) शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि भाजपचे गिरीश बापट यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.
  • सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी शिवसेनेचे नितीन बानगुडे-पाटील आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.
  • नाशिक, दिंडोरी, रावेर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांसाठी शिवसेनेचे दादा भुसे आणि गिरीश महाजन यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.
  • हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद मतदारसंघांसाठी शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि भाजपतर्फे पंकजा मुंडे यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.
  • बुलढाणा, अकोला, वाशीम-यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर आणि रामटेक मतदारसंघांसाठी शिवसेनेतर्फे डॉ. दीपक सावंत आणि भाजपातर्फे चंद्रशेखर बावनकुळे यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

मात्र, या संपूर्ण समितीमध्ये एकनाथ खडसेंना मात्र डावल्याचे पहायला मिळत आहे.

- Advertisement -

आधी मनोमिलन मगच प्रचार सभा

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युती झाली असली तरी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या युतीमुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे आधी या नाराज कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं यासाठी युतीने समिती नेमली असून, या समितीतील नेते दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवूण आणणार असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले.


हेही वाचा –‘ते स्वप्न भारी पडले’, खडसेंनी मनातली खदखद बोलून दाखवली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -