घरटेक-वेकसॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन ५ एप्रिलला बाजारात

सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन ५ एप्रिलला बाजारात

Subscribe

कोणत्याही प्री बुकींगशिवाय गॅलेक्सी S10 5G स्मार्ट फोन पाच एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

एप्रिल महिन्यात 5G चा पहिला स्मार्ट फोन लॉंच होणार आहे. हा सॅमसंगचा जगभरातून पहिला 5Gचा येणारा स्मार्ट फोन असणार आहे. खूप दिवसापासून या स्मार्ट फोनची वाट ग्राहक बघत होते. मात्र या स्मार्ट फोनच्या लॉंच करण्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. ५ एप्रिलला सॅमसंगचा 5G चा पहिला स्मार्ट फोन लॉंच होणार असल्याचे सॅमसंगने सांगितले.

- Advertisement -

सॅमसंगचा पहिला 5G स्मार्ट फोन एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात दक्षिण कोरीयामध्ये लॉंच करणार आहे. हा फोन जगातील 5G नेटवर्कचा असून कोणत्याही प्री बुकींगशिवाय गॅलेक्सी S10 5G स्मार्ट फोन पाच एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

मात्र सॅमसंगने या फोनची किंमत जाहीर केली नसून कोरियन बाजारात या फोनची किंमत १५ लाख (१३३२ डॉलर) इतकी असू शकते. तर, भारतीय बाजारात या स्मार्ट फोनची किंमत साधारण ९१ हजार ४०० रूपये असू शकते. गॅलेक्सी S10 5G स्मार्ट फोनचे मॉडेल करण्यात आलेल्या चाचणीत पास झाले असून दक्षिण कोरीयातील बाजारपेठेत विक्रीस आणण्यास मान्यता मिळाली असून भारतीय बाजारपेठेत हा स्मार्ट फोन विक्रीस कधी दाखल होणार हे अजून स्पष्ट करण्यात आले नाही.

फोनची वैशिष्टे

3D डेप्थ कॅमेरा
6.7 इंच कॅमेरा
ट्रिपल कॅमेरा सिस्टम
4500 mAh बॅटरी
अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर
वायरलेस पॉवरशेअर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -