घरमुंबईमासेमारीसाठी जिलेटीन नळकांड्यांचा स्फोट

मासेमारीसाठी जिलेटीन नळकांड्यांचा स्फोट

Subscribe

वालकस बेहरे पूल कोसळण्याचे कारण

जलसंपदा विभागाच्या शहापूर भातसा प्रकल्पांतर्गत असलेला कल्याण तालुक्यातील वाळकस बेहरे या गावांना जोडणार्‍या भातसा नदी पुलाचे दोन पिल्लेर अचानक ढासळून पूल कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी येथे घडली. नदीत मासेमारी करण्यासाठी स्थानिक मच्छीमारांकडून पुलालगत असलेल्या प्रस्तंभाजवळ मोठ्या प्रमाणात जिलेटीन नळकांड्यांचा स्फोट घडविला जात असल्याने या पुलाच्या पिलरला तडे जाऊन हा पुल कमकुवत झाल्याने या पुलाचे पिलर ढासळाल्याने हा पुल कोसळ्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पूल कोसळत असताना सुदैवाने या पुलावरून त्यावेळी कोणी प्रवास करीत नसल्यान मोठीे दुर्घटना टळली आहे. मात्र पूल कोसळल्याने वालकस- बेहरे गावाचा भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड शहराशी संपर्क तुटला आहे. पुलाच्या पिलर लगत मासेमारीसाठी स्फोट घडविले गेल्याने नदीत मध्यभागी पिलरला तडे जाऊन हा पूल कोसळल्याचे जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी या घटनेनंतर स्पष्ट केले.

- Advertisement -

भातसा उजवा कालवा विभागामार्फत हा पूल 1973 साली उभारण्यात आला होता. तब्बल 42 वर्ष जुना पूल असलेल्या या पुला खालून भातसा नदीचे पाणी बाराहामाही वाहत असते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर काही गावकरी स्थानिक मासेमारी करीत असतात. काही महिन्यापासून या पुलाच्या मध्यभागी असलेल्या पिलर जवळच मासेमारीसाठी जिलेटीन कांड्याचा वापर करून स्फोट घडवून आणले जात होते. 11 मार्च रोजी मध्यभागी असलेल्या पिल्लरचा अर्धाभाग यापूर्वी कोसळला होता. याची माहिती स्थानिक गावकर्‍यांनी भातसा कालवा विभागच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून दिली होती. त्या माहितीच्या आधारावर भातसा उपविभागीय अभियंता आनंद उदमले यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता खडवली पोलीस प्रशासन व भिवंडी तहसीलदार यांना या पुलाच्या दुरवस्थेची आणि पूल धोकादायक झाल्याची लेखी माहिती देत जिलेटीन कांड्याच्या स्फोटामुळे पुलाला तडे गेल्याची कळविले होते. तसा अहवाल दिला होता. पुलाची तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. परंतु दुरुस्ती अगोदरच शुक्रवारी सकाळच्या सुमाराला हा पूल अचानक मध्यभागी कोसळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -