घरदेश-विदेशरायबरेलीत सोनिया गांधी यांना शह देण्यासाठी भाजपाची रणनिती

रायबरेलीत सोनिया गांधी यांना शह देण्यासाठी भाजपाची रणनिती

Subscribe

रायबरेली, आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील निवडणुकांवर सर्व देशाचे लक्ष असते. कारण या राज्यातून दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. त्यापैकीच एक म्हणजे काँग्रेसचा गड असलेली रायबरेली लोकसभा मतदारसंघाची जागा. या जागेवरून माजी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून येतात.

सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून कोणाला उमेदवारी देणार हे अजून भाजपकडून जाहीर केले नसले तरी सोनिया गांधी यांची डोकेदुखी वाढवण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात आहे. काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी अनेक नावे पुढे येत आहे. त्यामध्ये मागील भाजप उमेदवार अजय अग्रवाल यांचे नाव आघाडीवर आहे.

- Advertisement -

रायबरेली लोकसभा मतदारसंघाशी गांधी-नेहरू घराण्याचे जुने नाते आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोतीलाल नेहरू आणि 1921 मध्ये मुशींगंज येथील शेतकर्‍यांवर झालेल्या गोळीबारानंतर जवाहरलाल नेहरू याठिकाणी आले. आतापर्यंत तीन अपवाद वगळता रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला पराभूत करण्यात यश आले नाही. 1977 मध्ये जनता पार्टीकडून राज नारायण, 1996 आणि 1998 मध्ये भाजपचे अशोक कुमार सिंह यांनी रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला पराभूत केले होते. मात्र त्यानंतर या मतदारसंघावर नेहरु-गांधी कुटुंबाचा वचक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -