घरक्रीडाIPL 2019 मध्ये सुपर ओव्हरचा पहिला थरार; मात्र सरशी दिल्लीचीच!

IPL 2019 मध्ये सुपर ओव्हरचा पहिला थरार; मात्र सरशी दिल्लीचीच!

Subscribe

आयपीएल २०१९ च्या १२ व्या हंगामात पहिल्यांदाच सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. दिल्लीला २० ओव्हरमध्ये विजयसाठी १८६ धावांचे टार्गेट कोलकाताने दिले होते. मात्र दिल्लीने १८५ धावा केल्यामुले आयपीएल २०१९ मधील पहिला सामना बरोबरीत सुटला आणि फिरोजशहा कोटला मैदानातील प्रेक्षकांना यंदाचा पहिला सुपर ओव्हर सामना पाहायला मिळाला. सुपर ओव्हमध्ये दिल्लीने पहिल्यांदा बॅटिंग करताना कोलकाता समोर ११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र दिल्लीच्या रबाडाने टिच्चून यॉर्कर टाकल्यामुळे अवघ्या सात धावातच कोलकाताचा डाव आटोपला. त्यामुळे तीन धावांनी कोलकाताला पराजयाचे तोंड पाहावे लागले.

पॉइंट टेबलमध्ये टॉपला असणाऱ्या केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्ससोबत एक पराभव आणि २ गुणांसह चौथ्या स्थानावर असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा शनिवारचा दुसरा सामना अपेक्षेप्रमाणेच रंगतदार होता. केकेआर आपला अव्वल क्रमांक राखण्यासाठी तर दिल्ली आपला एक पराभव भरून काढण्यासाठी मैदानात उतरले होते. टॉस जिंकून दिल्लीचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं फिल्डींगचा निर्णय घेतला. इशांत शर्मासोबत किमो पॉल, राहूल तिवाटिया आणि अक्षर पटेल या तिघांना या मॅचमध्ये दिल्लीने विश्रांती दिली होती. त्यांच्या जागेवर ख्रिस मॉरिस आणि हर्शल पटेल हे २ फास्ट बॉलर, लेगस्पीनर संदीप लमिछाने आणि बॅट्समन हनुमा विहारी या चौघांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे दिल्लीची बाजू आधीपासूनच बॅलन्स्ड वाटत होती. शिवाय होम पीच असल्यामुळे आधीच दिल्लीकडे कललेली पसंती टॉस जिंकल्यामुळे त्यांच्या बाजूने अधिकच झुकली. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरेनला दुखापतीमुळे विश्रांती द्यावी लागल्यामुळे त्याच्या जागेवर विकेटकीपर बॅट्समन निखिल नाईकला टीममध्ये घेण्यात आलं होतं.

- Advertisement -

केकेआरची टॉप ऑर्डर ढासळली

केकेआरच्या डावाच्या पहिल्या १० ओव्हर्समध्ये दिल्लीचा फिल्डींगचा निर्णय योग्यच होता याचा पुरावाच दिला. लमिछानेनं आपली निवय सार्थ ठरवत सलामीवीर निखिल नाईकला चौथ्याच ओव्हरमध्ये माघारी धाडलं. त्याच्या पाठोपाठ सहाव्या ओव्हरमध्ये पटेलनं रॉबिन उथप्पाचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. रबाडानं सातव्या ओव्हरमध्ये सुरुवातीपासूनच अडखळत खेळणाऱ्या लिनला २० रन्सवर आऊट केलं, तेव्हा केकेआरच्या फक्त ४० धावा झाल्या होत्या. हे कमी म्हणून की काय, पटेलनं नितिश राणाला रबाडाकरवी झेलबाद केलं. १ रनवर राणा आऊट झाला, तेव्हा केकेआरची अवस्था ४ विकेटच्या बदल्यात ८ ओव्हरमध्ये ४४ रन अशी होती. एकीकडून कॅप्टन दिनेश कार्तिक डाव सावरत असताना दुसरीकडे शुभम गिल चुकीच्या कॉलमुळे १०व्या ओव्हरमध्ये रनआऊट झाला. ६१ रनवर पाचवी विकेट पडल्यामुळे केकेआरचा डाव चांगलाच अडचणीत आला होता.

रसेलचा ‘स्पेशल शो!’

गिल आऊट झाल्यानंतर आलेल्या आंद्रे रसलनं कॅप्टनला साथ देत केकेआरचा डाव सावरला. एवढंच नाही, तर त्याच्या नेहमीच्या शैलीमध्ये तुफान फटकेबाजी करत अवघ्या २३ बॉलमध्ये हाफ सेंच्युरीदेखील तडकावली. यात तब्बल ६ सिक्सर आणि फक्त २ चौकारांचा समावेश होता. मॉरिसच्या बॉलिंगवर आर तिवतियानं रसेलचा कॅच पकडला तोपर्यंत त्यानं त्याचं काम केलं होतं. २८ बॉलमध्ये ६८ रन करत रसेलनं टीमचा स्कोअर दीडशेपार नेऊन ठेवला होता. सहाव्या विकेटसाठी त्याने कार्तिकसोबत ९८ रनांची पार्टनरशीप केली होती.

- Advertisement -

रसेल आऊट झाल्यानंतर कार्तिकने त्याचं अर्धशतक पूर्ण करताच रिषभ पंतकडे कॅच देऊन तो माघारी परतला. तळाच्या बॅट्समन्सनी शेवटच्या षटकांमध्ये थोडीफार रनांची भर घातल्यानंतर केकेआऱचा डाव २० ओव्हरनंतर १८५ धावांवर आटोपला.

होम पीच असल्यामुळे दिल्लीच्या सलामीवीरांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, शिखर धवनने तिसऱ्याच ओव्हरमध्ये निराशा करत मिडऑफला उभ्या असलेल्या आंद्रे रसेलकडे कॅच दिला. २७ रनांवर पहिला झटका बसल्यामुळे दिल्लीचा डाव आपोआप संथ झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -