घरमहाराष्ट्रनाशिककर्मचार्‍यांनो, अग्निशमन केंद्राजवळच राहा

कर्मचार्‍यांनो, अग्निशमन केंद्राजवळच राहा

Subscribe

आयुक्तांचा आदेश; शासकीय निवासस्थान छोटे असल्याने नाराजी

अग्निशमन ही अतितातडीची सेवा असल्याने संबंधित कर्मचार्‍यांनी अग्निशमन केंद्रालगतच्या शासकीय निवासस्थानात रहावे असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बंधनकारक केले आहे. मात्र शासकीय निवासस्थानाचा आकार छोटा आणि अनेक कुटूंबांचा विस्तार मोठा असल्याने या निवासस्थानांमध्ये कसे रहावे असा यक्ष प्रश्न संबंधित कर्मचार्‍यांना आता भेडसावतो आहे. त्यामुळे आयुक्तांनी निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी कर्मचार्‍यांकडून पुढे आली आहे.

आग लागण्याची घटना दिवसा वा रात्री-अपरात्री कधीही घडू शकते. याशिवाय भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्तीचाही भरोसा नसतो. अशा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन कर्मचारी तातडीने अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी पोहचल्यास जीवीत हानी टाळता येणे शक्य असते. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांना अग्निशमन केंद्रालगतच्या शासकीय निवासस्थानात राहणे बंधनकारक केले आहे. अग्निशमन दलात कार्यरत १०० पेक्षा अधिक कर्मचार्‍यांनी पन्नाशी गाठली आहे. कुटुंबाचा विस्तार वाढल्याने पालिकेच्या वन रुम किचनच्या सदनिकेत वास्तव्य करणे या कर्मचार्‍यांना परवडणारे नाही. त्यात या शासकीय निवासस्थानाच्या भाडेपोटी वेतनातून कपात होणारी रक्कमही अधिक असल्याने शासकीय निवासस्थानांमध्ये जाण्यास कर्मचारी नकार देत आहेत.

- Advertisement -

सदनिका रिकाम्याच

शहरात महापालिकेची सहा अग्निशमन केंद्र आहेत. यातील काही सदनिका रिकाम्या आहेत, तर निम्म्या सदनिकांचा स्वच्छता व अन्य विभागातील कर्मचार्‍यांकडून वापर होत आहे. अग्निशमन दलात ५६ रिक्त पदे असल्याने इतर कर्मचार्‍यांवर कामाचा ताण निर्माण होतो. त्यामुळे रिक्त पदांची कसर भरुन काढण्यासाठी, तसेच रिकाम्या सदनिांकांचा वापर होण्यासाठी आयुक्त गमे यांनी अग्निशमन दल प्रमुखांना कर्मचार्‍यांना पालिकेच्या सदनिकांमध्ये वास्तव्य बंधनकारक करण्याचे आदेश दिले आहे.

परिसर सदनिकांची संख्या

शिंगाडा तलावाजवळील केंद्रालगत – १४
सातपूर विभाग – ३०
नाशिकरोड – ३२
नवीन नाशिक – ४८
पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयाजवळील केंद्रालगत – ३६
मालेगाव स्टॅण्ड येथील अग्निशमन केंद्रालगत – १६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -