घरमहाराष्ट्रभाजपला मतदान करू नका, ६०० कलाकारांचं आवाहन

भाजपला मतदान करू नका, ६०० कलाकारांचं आवाहन

Subscribe

देशात निर्माण झालेल्या अभिव्यक्तीच्या र्‍हासाचा निषेध म्हणून ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहांसह ६०० कलाकारांनी भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. मतदान करा आणि भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून बाहेर हाकला, असं आवाहन या कलाकारांनी केलं आहे. ज्येष्ठ कलाकारांच्या या अहवानामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे.

या कलाकारांनी एक पत्रक जारी करून हे आवाहन करण्यात आले आहे. त्यावर नसिरुद्दीन शहा यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, उनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत. १२ भाषांमध्ये हे पत्र तयार करण्यात आले असून आर्टिस्ट यूनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आले आहे. भारतीय संविधान धोक्यात आहे. भाजपला मतदान करू नका, असही या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

सध्याची लोकसभा निवडणूक देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आज गीत, नृत्य, हास्यही धोक्यात आहे. आपले आगळेवेगळे संविधानही धोक्यात आले असल्याचे या कलाकारांनी म्हटले आहे. ज्या ठिकाणी तर्क, चर्चा आणि असहमतींना वाव दिला जातो, अशा संस्था, यंत्रणांचा गळा घोटण्यात आला आहे, असे या पत्रात नमूद आहे. कोणतीही लोकशाही प्रश्न, चर्चा आणि दक्ष विरोधी पक्षांशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाही. मात्र सध्याच्या सरकारने या सर्व गोष्टी पायदळी तुडविल्या आहेत. यामुळेच सर्वांनी भाजपला सत्तेतून हाकलण्यासाठी मतदान करायला हवे. कट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून घालवा, संविधान वाचवा, असे आवाहनही या पत्रातून करण्यात आले आहे.

या आधीही १०० हून अधिक सिनेकलावंतांनी भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. मळ्यालम दिग्दर्शक आशिक अबू, आनंद पटवर्धन, सुदेवन, दीपा धनराज, गुरविंदर सिंह, पुष्पेंद्र सिंह आणि प्रवीण मोरछले आदींनी हे आवाहन केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -