घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या केवल पार्क भागात सिलेंडरचा स्फोट; ४ जखमी

नाशिकच्या केवल पार्क भागात सिलेंडरचा स्फोट; ४ जखमी

Subscribe

नाशिकच्या सिडको भागातील केवल पार्कमधील एका घरात रविवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट

सिडकोच्या अंबड-लिंक रोड परिसरातील केवल पार्क भागातील घाटोळ वस्तीमधील एका घरात रविवारी, ७ एप्रिलला सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत ठाकरे कुटुंबातील पती, पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाले.

कामगारबहुल भागात असलेल्या घाटोळ वस्तीत लहानशा घरात राहणाऱ्या ठाकरे कुटुंबाच्या घरात हा स्फोट झाला. रविवारी सकाळी कामाला निघण्यापूर्वी घरातील शैला ठाकरे यांनी स्वयंपाकासाठी गॅस पेटवताच शेगडीच्या नळीजवळ लिक झालेल्या गॅसने पेट घेतला. रात्री गॅस लीक झाल्याची शक्यताही वर्तविली जाते आहे. स्फोट झाला त्यावेळी घरातील सदस्य जमीनीलगत असल्याने ते वाचले. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने घराच्या छताचे पत्रे उडाले, तसेच घरगुती सामानाचेही मोठे नुकसान झाले. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

जखमींची नावे अशी…

रवींद्र ठाकरे (३५), शैला ठाकरे (३०), शुभम ठाकरे (७), प्रांजल ठाकरे (३)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -