घरदेश-विदेशगुडन्यूज! रेल्वेमध्ये मेगाभरती

गुडन्यूज! रेल्वेमध्ये मेगाभरती

Subscribe

बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. . रेल्वे आता रिक्त जागा भरणार असून ग्रुप डी पदांसाठी मोठी भरती निघाली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असल्याने शिक्षण असून देखील बरेच तरुण नोकरीच्या शोधात आहेत. अशा बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे आता रिक्त जागा भरणार असून ग्रुप डी पदांसाठी ही मोठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल आहे. तसेच या पदासाठी दहावी, बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील अर्ज करु शकतात.

या वयोगटातील उमेदवार भरु शकातात अर्ज

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षे ते ३३ वर्षे वयोगटामध्ये असणे गरजेचे आहे. यामध्ये OBC आणि General विभागातील उमेदवारांकडून अर्ज शुल्क ५०० रुपये आकारण्यात येणार आहे तर एससी, एसटी आणि महिला वर्गांसाठी हे शुल्क २५० रुपये आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाची माहिती असणे गरजेचे आहे.

जागांची संख्या

  • सेन्ट्रल रेल्वे – ९ हजार ३४५
  • इस्ट सेन्ट्रल रेल्वे – ३ हजार ५६३
  • इस्ट कोस्ट रेल्वे – २ हजार ५५५
  • इस्टन रेल्वे सीएलडब्ल्यू आणि मेट्रो, नॉर्थ सेन्ट्रल रेल्वे आणि डीएलएम- ४ हजार ७३०
  • नॉर्थ इस्टन रेल्वे, एमसीएफ आणि आरडीएलओ – ४ हजार ००२
  • नॉर्थ वेस्टन रेल्वे – ५ हजार २४९
  • नॉर्थन रेल्वे, नॉर्थइस्ट रेल्वे – २ हजार ८९४
  • डीएमडब्ल्यू आणि आरसीएफ – १३ हजार १५३
  • साउथ सेंट्रल रेल्वे – ९ हजार ३२८
  • साउथ इस्ट सेन्ट्रल रेल्वे – १ हजार ६६४
  • साउथ इस्टर्न रेल्वे – ४ हजार ९१४
  • साउथ वेस्टर्न रेल्वे आणि आरडब्ल्यूएफ – ७ हजार १६७
  • साउथ रेल्वे आणि आयसीएफ – ९ हजार ५७९
  • वेस्ट सेन्ट्रल रेल्वे – ४ हजार ०१९
  • वेस्टर्न रेल्वे – १ हजार ०७३४
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -