घरमुंबईतावडेंना गाडीत बसण्याची संधी द्या; मनसेचे राजनाथ सिंह यांना पत्र

तावडेंना गाडीत बसण्याची संधी द्या; मनसेचे राजनाथ सिंह यांना पत्र

Subscribe

मनसेने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये सिंह यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना गाडीत बसण्याची एकदा तरी संधी द्यावी अशी विनंती केली आहे.

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात मनसे उतरली जरी नसली तरी मोदी-शहांविरोधात राज ठाकरे महाराष्ट्रभरात सभा घेत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज ठाकरेंनी स्क्रिप्ट पुरवत असल्याचा आरोप विनोद तावडेंनी केला आहे. मंगळवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी टुरिज टॉकिजची स्क्रिप्ट शरद पवार यांनी राज ठाकरे यांना सोलापूर येथील एका हॉटेलमधील दिली, असा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने विनोद तावडेंवर निशाना साधला आहे. मनसेचे नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे यांनी राजनाथ सिंह यांना पत्र लिहून त्यांची खिल्ली उडवली आहे.

पत्रामार्फत मनसेची विनंती

विनोद तावडेंचा गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये विनोद तावडे राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गाडीच्या ड्राईव्हरने त्यांना गाडीत बसू दिले नव्हते. याच व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर मनसेचे गजानन काळे यांनी राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले आहे. राजनाथ सिंह यांनी विनोद तावडे यांना गाडीत बसण्याची एकतरी संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी पत्रामार्फत केली आहे.

- Advertisement -

विनोद तावडेंचा व्हायरल व्हिडिओ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -