घरदेश-विदेशकाँग्रेसला मतदान करण्यासाठी अमेठीत महिलेवर सक्ती

काँग्रेसला मतदान करण्यासाठी अमेठीत महिलेवर सक्ती

Subscribe

या व्हिडिओमध्ये एक महिला काँग्रेसला मतदान करण्यासाठी आपल्यावर सक्ती करण्यात आली असा आरोप करताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीकरिता आज राज्यभरातील ५१ मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. आज राज्यभरातील पाचव्या टप्प्यातील मतदान होत असून ६७४ उमेदवार उभे आहेत. यावेळी अमेठी मतदारसंघात एक भलताच प्रकार समोर आला आहे. या मतदार संघात जबरदस्तीने राहूल गांधींच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रावर ताबा मिळवत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला आहे.

या संदर्भातील एक व्हिडिओ स्मृती इराणी यांनी ट्विट केला आहे. या ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये फक्त कॉंग्रेसलाच मतदान करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

- Advertisement -

‘माझा जबरदस्तीने हात पकडून काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेले बटण दाबायला भाग पाडले. मला भाजपाला मतदान करायचे होते, परंतु बळजबरीने हात धरून हाताच्या पंजाला मत द्यायला लावले. ‘ असे व्हिडीओमध्ये त्या महिलेने म्हटले आहे.

- Advertisement -

योग्य कारवाई होईल अशी अपेक्षा 

या घडलेल्या घटनेनंतर स्मृती इराणींनी निवडणूक आयोगाने याची जाणीव पुर्वक दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच प्रशासन आणि निवडणूक आयोगाला सर्तक करण्यासाठी हा व्हिडिओ ट्वीट केल्याचे भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी सांगितले आहे. या संदर्भात योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा असून राहूल गांधीना अशा केलेल्या राजकारणासाठी कारवाई करायची की नाही हे देशातील जनतेला ठरवायचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमेठीमध्ये काँग्रेसचे अधिक वर्चस्व असल्याने निवडणुक दरम्यान या लढतीकडे सगळया देशाचे लक्ष लागले आहे. २०१४ मध्ये राहुल गांधींनी स्मृती इराणीचा अमेठीमध्ये पराभव केला होता. पण स्मृती इराणींच्या विरोधात राहूल गांधी असल्याने  मोठया प्रमाणावर राहुल गांधींच्या मतदानाच्या टक्केवारीवर यंदा परिणाम होतो का हे पहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -