घरमुंबईएसटीच्या ऑनलाईन तिकीट आरक्षणाची गाडी सुसाट

एसटीच्या ऑनलाईन तिकीट आरक्षणाची गाडी सुसाट

Subscribe

४५ टक्के तिकिटाचे आरक्षण डिजिटल प्लॅटफॉर्म वरून

खासगी प्रवासी वाहतूकीला टक्कर देण्यासाठी कात टाकत असलेल्या राज्य मार्ग परिवाहन महामंडळ (एसटी) माहिती आणि तंत्रज्ञानाची कास धारल्यामुळे एसटी महामंडळाच्या डिजिटल तिकीट आरक्षनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहेत. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यत एसटी महामंडळाची एकूण तिकीट आरक्षण पैकी सरासरी ४५ टक्के तिकिटाचे आरक्षण डिजिटल फ्लॅटफॉर्म वरून झाली आहे. त्यामुळे आता एसटीचे ऑलाईन तिकीट आरक्षणाची गाडी सुसाट धावत आहे.

देशातील सर्वांत मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. दोन वर्षांपूर्वी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी एका क्लिकवर तिकिटांचे आरक्षण करता यावे यासाठी ‘एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन अप सुरु केले आहेत. सोबतच एसटी महामंडळाच्या वेबसाईटवरून सुद्धा आरक्षण करू शकतात. सुरुवातीला पाहिजे तेवढा प्रतिसाद नव्हता. मात्र गेल्या एक वर्षात एसटीच्या ऑनलाइन तिकीट आरक्षणाला सुसाट प्रतिसाद मिळत आहे. एसटी महामंडळाची तिकीट आरक्षणासाठी पाच प्रकारची सुविधा आहे. ज्यात तिकीट खिडकी आरक्षण, खिडकीवरील एजंट,ऑनलाइन एजेंट, मोबाईल आणि वेब साईटच्या समावेश आहेत.

- Advertisement -

एसटी मंडळाच्या या पाचही प्रकारातून एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यत एसटीचे तिकीट आरक्षण हे ५६ लाख ६५ हजार २७७ इतके झाली आहे. यापैकी मोबाईल आरक्षण, वेब आरक्षण आणि आँनलाईन तिकीट एजंटच्या माध्यमातून एकूण 21लाख 30हजार 998 तिकीट आरक्षित झाल्या आहे. त्याच्या माध्यमातून 31लाख 28 हजार 272 प्रवासी लाभ घेतला आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यत एसटी महामंडळाची एकूण तिकीट आरक्षण पैकी एसटीच्या डिजिटल फ्लॅटफॉर्म वरून सरासरी ४५ टक्के झाली आहे. त्यामुळे आता एसटीचे ऑलाईन तिकीट आरक्षणाची गाडी सुसाट धावत राहावी यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. नुकतेच महाराष्ट्र एसटी कामगार सेनाकडून एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून थेट तिकीटीच आरक्षण करणार्‍या प्रवाशांना ५ टक्के सुट देण्याची मागणी केली आहेत. ज्या प्रामणे एसटी खासगी रेड बस आणि विविध अपला तिकीट आरक्षण देते. त्याच प्रमाणे एसटीच्या प्रवाशांची आरक्षणात सूट द्यावी. जेणेकरून वाढ एसटीचे ऑलाईन तिकीट आरक्षण करण्याची संख्या वाढेल.

मोबाईल अ‍ॅप्सला ही मिळतेय पसंती
खासगी प्रवासी वाहनांच्या बुकिंगसाठी गेल्या अनेक वर्षापासून मोबाईल अँप्लीकेशन उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना या सेवेकडे अधिक कल होता. त्यातच खासगी प्रवासी बसही अत्याधुनिक स्वरूपाच्या असल्याने एसटीकडे प्रवाशांचे दूर्लक्ष होत असल्याचे चित्र होते.मात्र एसटीने सुद्धा खासगी वाहतूकीला टक्कर देण्यासाठी अनेक उपक्रम राबिविले आहेत. अत्याधुनिक शिवनेरी बस, इंटरनेटद्वारे तिकिट बुकिंग आणि आता मोबाईल अँप्स द्वारे बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देऊन एसटीने डिजिटल क्षेत्राकडे पाऊल टाकले आहे. याला प्रतिसाद सुद्धा प्रवाशांना कडून मिळत आहे.

- Advertisement -

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -