घरमहाराष्ट्रपेन्शनधारकांचे सामुहिक मुंडण आंदोलन

पेन्शनधारकांचे सामुहिक मुंडण आंदोलन

Subscribe

पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या सुमारे दीडशे पेन्शनधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा दशक्रिया विधी पार पाडत पेन्शनधारकांनी मुंडण करून त्यांचा निषेध केला. राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पातळीवर हे आंदोलन सुरू आहे. नगर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेचे कार्याध्यक्ष नारायण होन, संपतराव समिंदर, आशा शिर्के, नंदकुमार कदम यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू होते. देशभरातील लाखो पेन्शनधारकांचे भविष्यनिर्वाह निधीतील प्रत्येकी दहा ते पंधरा लाख रक्कम जमा असूनही, पेन्शनधारकांना पेन्शन वाढ नाकारून एक प्रकारे त्यांची थट्टा केली जात आहे, असे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले. जर प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा उपस्थितांनी ठराव घेतला.

पेंशनधारकांच्या मागण्या

- Advertisement -

सर्व पेन्शनधारकांना ७ हजार ५०० रुपये व त्यावरील महागाई भत्ता एवढी दरमहा पेन्शन मिळावी. अंतरिम रिलीफ म्हणून दरमहा पाच हजार प्लस महागाई भत्ता त्वरित लागू करावा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्वांना हायर सॅलरी, हायर पेन्शन लागू व्हावी. या योजनेतील केंद्र सरकारचा हिस्सा कामगार प्रमाणेच ८.३३ टक्के करण्यात यावा. वीस वर्षे जुनी व त्याहून अधिक सेवा करणाऱ्या सर्वांना दोन वर्ष अधिकचा लाभ मिळावा. इपीएस पेन्शनधारकांना मोफत औषधोपचार, अन्नसुरक्षा योजना व प्रवास सवलत लागू करावी. योजनेतील पेन्शनधारकांचे कमी केलेले फायदे व हक्क परत लागू करण्याची मागणी पेन्शनधारकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -