घरमनोरंजनऊफफफ... हे नखरे! मौनीने गमावली नवाजुद्दीन सोबतची ही फिल्म

ऊफफफ… हे नखरे! मौनीने गमावली नवाजुद्दीन सोबतची ही फिल्म

Subscribe

'बोले चूड़ियां' या चित्रपटात बॉलिवूड क्षेत्रातील दमदार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत मौनी रॉयला कास्ट करण्यात आले होते.

छोट्या पडद्यावरून ‘नागिन’ मालिकेत आपल्या अभिनयाने अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मौनी रॉयला तिच्या आगामी ‘बोले चूड़ियां’ चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे. ‘बोले चूड़ियां’ या चित्रपटात बॉलिवूड क्षेत्रातील दमदार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत मौनी रॉयला कास्ट करण्यात आले होते. मात्र मौनी रॉयला तिच्या गैर वर्तवणुक तसेच तिचा बेजबाबदार स्वभाव या कारणांमुळे या येणाऱ्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.

- Advertisement -

या चित्रपटाचा काही दिवसांपुर्वीच मौनी रॉय आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा फर्स्ट लूकही समोर आला असला तरी चित्रपट निर्मात्यांनी मौनी रॉयला चित्रपटातून बाहेर काढले आहे.

 

View this post on Instagram

 

Come rain or shine , tummy only goes in when ‘tis the hour to dance ? …. rest of the time it’s only fooooooddd in there ?! Aarghhhh!

A post shared by mon (@imouniroy) on

- Advertisement -

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉय काही दिवसांपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मौनी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चूड़ियां’ मध्ये दिसणार होती. चित्रपट निर्माता राजेश भाटिया यांनी तिच्यावर अनप्रोफेशनल असल्याचा आरोप देखील लावला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शामास सिद्दीकी करत असून या चित्रपटाचे प्रोडक्शन राजेश भाटिया आणि किरण भाटिया करत आहे. हा चित्रपट जून पर्यंत तयार होणार असे सांगण्यात येत असून मुख्य़ भुमिकेत मौनी रॉय ऐवजी दुसरी अभिनेत्री दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -