घरभक्तीAkshaya Tritiya 2022 : अक्षय तृतीयेला करू नका 'या' ५ चूका ;...

Akshaya Tritiya 2022 : अक्षय तृतीयेला करू नका ‘या’ ५ चूका ; नाहीतर देवी लक्ष्मी होतील तुमच्यावर नाराज

Subscribe

अक्षय तृतीया या वर्षी मंगळवार दिनांक ३ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिष शास्त्रात अक्षय तृतीयेच्या दिवशी काही विशेष काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी मांगलिक कार्य आणि खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अक्षय तृतीया या वर्षी मंगळवार दिनांक ३ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिष शास्त्रात अक्षय तृतीयेच्या दिवशी काही विशेष काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.

अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी देवी लक्ष्मीला न आवडणारी ही कामे केल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते.

- Advertisement -

. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीसोबतचं भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते. भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. मात्र अशावेळी तुळशीचे पान तोडण्याआधी शारीरिक स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. अंघोळ न करता तुळशीचे पान तोडू नका.

- Advertisement -

. अक्षय तृतीयेच्या दिवशी रिकाम्या हाताने घरी जाणं खूप अशुभ मानले जाते. तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही एखादा सोने किंवा चांदीचा दागिना खरेदी करून घरी घेऊन या किंवा एखादी लहान-मोठी वस्तू सुद्धा तुम्ही खरेदी करून घरू घेऊन जाऊ शकता.

. अक्षय तृतीयेला अनेकजण नकळत फक्त देवी लक्ष्मीचीच पूजा करतात, परंतु लक्ष्मीबरोबर नेहमी भगवान विष्णूंची देखील पूजा केली पाहिजे. यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते.

.अक्षय तृतीयेच्या दिवशी अंघोळ न करता धन ठेवण्याच्या जागेची साफसफाई करू नका, घरात स्वच्छता ठेवा तसेच दिवाळी प्रमाणेच घराबाहेर दिवा लावा.

.अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मासांहारी जेवण बनवू नका व खाऊ नका. या दिवशी सात्विक शुद्ध आहार घ्या.

 

 

Hindu Shastra : हनुमान चालीसाचे नियमित पठण केल्याने होतात ‘हे’ अद्भूत फायदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -