Hindu Shastra : कृष्ण जन्माष्टमीचं काय आहे महत्त्व? जाणून घ्या कृष्णाष्टमीचा शुभमुहूर्त आणि तिथी

श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यावर्षी गुरूवारी,१८ ऑगस्ट रोजी कृष्णाष्टमी साजरी केली जाईल.

श्रावण महिना सुरू झाला की नागपंचमी आणि रक्षाबंधननंतर कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्वपूर्ण मानले जाते. कारण या दिवशी भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यावर्षी गुरूवारी,१८ ऑगस्ट रोजी कृष्णाष्टमी साजरी केली जाईल.

कृष्णाष्टमीचा तिथी

 • कृष्ण जन्माष्टमी- १० ऑगस्ट २०२२, गुरुवार
 • अष्टमी तिथी प्रारंभ : १८ ऑगस्ट, रात्री ९ वाजून २० मिनीटपासून
 • अष्टमी तिथी समाप्ती : १९ ऑगस्ट, रात्री १० वाजून ५९ मिनीटपर्यंत
 • दही हंडी- १९ ऑगस्ट, शुक्रवार

जाणून घ्या, कृष्णाष्टमीचा शुभ मुहूर्त

 • कृष्णाष्टमीच्या भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी काही शुभ मुहूर्त आहेत.
 • १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ५ मिनीटांपासून ते १२ वाजून ५६ मिनीटांपर्यंत अभिजीत मुहूर्त असणार आहे.
 • तर रात्री ८ वाजून ४१ मिनिटांपासून ते १९ ऑगस्ट रात्री ८ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ध्रुव योग असेल. ज्योतिष शास्त्रामध्ये हे योग शुभ मानले जातात.

अशा प्रकारे करा श्रीकृष्णाची पूजा

 • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
 • घरातील देवी-देवतांची पूजा करावी.
 • त्यानंतर श्रीकृष्णांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना ‘क्लीं कृष्णाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
 • त्यानंतर श्रीकृष्णांच्या मूर्तीला जलाभिषेक करावा.
 • जलाभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पाळण्यात ठेवावी.
 • गंध, अत्तर , पुष्प, धूप, दीप, तुळस आणि लाडवाचा नैवेद्य त्यांना अर्पण करावा. श्रीकृष्णांची आरती करावी.
 • कृष्णाष्टमीच्या दिवशी रात्री श्रीकृष्णांची विशेष पूजा करावी.

 हेही वाचा :Hindu Shastra : शनीच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ महत्त्वाचे उपाय