घरभक्तीघरात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता येण्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेला करा 'हे' उपाय

घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता येण्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय

Subscribe

ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केल्याने धन-धान्याची कमतरता राहत नाही. तसेच घरात सुख-समृद्धी सुद्धा येते

ज्येष्ठ पौर्णिमेच्या व्रताला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या नावाने ओळखले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केल्याने धन-धान्याची कमतरता राहत नाही. तसेच घरात सुख-समृद्धी सुद्धा येते.

‘या’ उपायांनी नाही राहणार धन-धान्याची कमतरता

- Advertisement -
  • ज्येष्ठ पौर्णिमेला ११ कवड्या घेऊन एका लाल कपड्यात ठेवून घराच्या मंदिरात देवी लक्ष्मीच्या पायाशी ठेवून द्या. त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करा आणि कवड्यांवर हळदीचा टिळा लावा. आता काही वेळानंतर कवड्या घेऊन कपडयासोबत आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. या उपायाने देवी लक्ष्मीचा आर्शिवाद तुमच्यावर निरंतर राहिल.
  • ज्येष्ठ पौर्णिमेला चंद्राचे पूजन करा तसेच दूधात मध आणि चंदन एकत्र करून चंद्राला अर्घ्य द्या. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
  • ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. या उपायाने जीवनातील अनेक समस्या दूर होतील.
  • व्यापारात यश मिळवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी एका तांब्यामध्ये पानी आणि कच्चे दूध , बत्तासे एकत्र करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा.

ज्येष्ठ पौर्णिमेला ‘या’ गोष्टी आवर्जून करा

- Advertisement -
  • देवी लक्ष्मीचे पूजन करा
    पौर्णिमा तिथीला देवी लक्ष्मीचे पूजन केल्याने देवीचा विशेष आर्शिवाद प्राप्त होतो. तसेच या दिवशी देवी लक्ष्मी बरोबरच भगवान विष्णूंची देखील पूजा करा.
  • तूपाचा दिवा लावा
    पौर्णिमेच्या पवित्र दिवशी देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटो समोर तूपाचा दिवा लावा. धार्मिक मान्यतेनुसार असा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. देवी लक्ष्मीचा विशेष आर्शिवाद तुम्हाला प्राप्त होईल.
  • देवी लक्ष्मीला खीरीचा नैवेद्य अर्पण करा
    धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीला दूधाची खीर खूप आवडते. त्यामुळे पौर्णिमेला देवी लक्ष्मीला खीरीचा नैवेद्य अर्पण करा. या उपायाने देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहिल.

 

 

टीप : MyMahanagar कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही.


हेही वाचा :Vat Purnima 2022 : ‘या’ दिवशी साजरी केली जाणार वट पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -