घरभक्तीआज नवरात्रीनिमित्त नवमी तिथीच्या शुभ मुहूर्तावर करावे कन्यापूजन, 'या' गोष्टींची घ्या काळजी

आज नवरात्रीनिमित्त नवमी तिथीच्या शुभ मुहूर्तावर करावे कन्यापूजन, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Subscribe

चैत्र नवरात्रीची नवमी तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण या दिवशी रामनवमीही साजरी केली जाते. नवरात्रीच्या नवमीला कन्यापूजन केल्यास ते खूप शुभ मानले जाते. कन्यापूजन केल्याने देवी माता प्रसन्न होते. त्यामुळे नऊ मुलींना घरात बोलावून कंजक खाऊ घातले जाते. या दिवशी आधी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते, त्यानंतर कन्यापूजन केले जाते. कन्यापूजनात लहान मुलींसोबत एका मुलालाही बसवले जाते. मुली माँ दुर्गेचे वास्तविक रूप असल्याने त्यांची पूजा केल्यानंतर त्यांना खाऊ घातल्यास माँ दुर्गेचे मन प्रसन्न होते.

नवमी कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त
नवमीच्या दिवशी चौघडिया मुहूर्तावर कन्यापूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. आज सकाळी 10.52 ते 12.25 पर्यंत कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर कन्यापूजन केल्यास माता राणीचा विशेष आशीर्वाद मिळतो. या मुहूर्तावर काही कारणाने कन्यापूजन करता आले नाही तर काळजी करण्याची गरज नाही, कारण नवमीच्या दिवशी दिवसभरात कधीही मुलींना कंजक खाऊ घालता येऊ शकते. दोन्ही स्थितीत भक्तांना माता राणीचा आशीर्वाद मिळतो.

- Advertisement -

कन्या पूजन कसे करावे
कन्या पूजन करण्याआधी माँ दुर्गेचे नववे रूप माँ सिद्धिदात्रीची पूजा करावी. माँ सिद्धिदात्रीच्या पूजेसाठी सकाळी उठल्यावर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. त्यानंतर माँ सिद्धिदात्रीचे स्मरण करून उपवासाचे व्रत सुरू करावे. यानंतर मातेची चौकी सजवावी, पूजा करावी, आरती म्हणावी आणि मातेला नैवेद्य द्यावे. हा नैवेद्य नंतर लहान मुलींना कंजकमध्ये प्रसाद म्हणून दिला जातो.
कन्यापूजन करण्यासाठी नऊ मुलींना घरात बोलावून त्या मुलींचे पाय ताटात ठेवून स्वच्छ पाण्याने धुवावे. लहान मुली माँ दुर्गेचे वास्तविक रूप असल्यामुळे त्यांची पूजा केली जाते. त्यांच्या हातात धागा बांधून कपाळावर टिका लावला जातो. यानंतर प्रसादात हरभरा, हलवा आणि पुरीसोबत नारळाचा तुकडा कंजकमध्ये दिला जातो. कंजक झाल्यानंतर मुलींना भक्तीनुसार कोणतीही भेटवस्तू, सजावटीची वस्तू किंवा पैसे दिले जातात.
मुलींच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यानतंर कन्यापूजन संपते. कन्यापूजन संपल्यानंतर गायीला पुरी खाऊ घालणे सुद्धा शुभ मानले जाते. या दिवशी मुलींवर राग व्यक्त न करणे, त्यांचा आदर राखावा आणि त्यांना प्रेमाने वागवावे याची विशेष काळजी घेतली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -