घरभक्तीभगवान विष्णूंच्या नावापुढे 'श्री' का लावतात, जाणून घ्या कारण

भगवान विष्णूंच्या नावापुढे ‘श्री’ का लावतात, जाणून घ्या कारण

Subscribe

सध्याच्या काळात 'श्री' या शब्दाकडे आदराचा शब्द म्हणून पाहिले जाते, म्हणूनच आज हा शब्द घरातील आणि कुटुंबातील ज्येष्ठ किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीसाठी वापरला जातो

नवी दिल्ली : सनातन धर्मात अनेक वेद-पुराण आहेत, ज्यामध्ये सर्व देवी-देवतांचे तपशीलवार वर्णन आहे. या सर्वांमध्ये भगवान विष्णू आणि त्यांची सर्व रूपे अनेक वेळा अधोरेखित केली जातात. तसेच भगवान विष्णूच्या सर्व कथा आणि उद्दिष्टेही पटवून सांगितली जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की भगवान विष्णू आणि त्यांच्या सर्व अवतारांच्या नावापुढे ‘श्री’ का वापरला जातो. जसे श्रीहरी, श्रीराम, श्रीकृष्ण इ. असे का? इतर देवतांच्या नावांसमोर बहुतेक वेळा ‘श्री’ का लावला जात नाही? ‘श्री’ वापरून केवळ भगवान विष्णूंचाच सन्मान होतो, असे नाही. उलट याचे कारण वेद आणि पुराणात दिलेले आहे. जाणून घेऊयात

‘श्री’ चा अर्थ काय? (श्रीचा अर्थ)

सध्याच्या काळात ‘श्री’ या शब्दाकडे आदराचा शब्द म्हणून पाहिले जाते, म्हणूनच आज हा शब्द घरातील आणि कुटुंबातील ज्येष्ठ किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीसाठी वापरला जातो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भगवान विष्णूच्या नावासमोर फक्त ‘श्री’ लावण्याचा नियम शास्त्रात सांगण्यात आला आहे. कारण श्रीहरीसमोर ‘श्री’चा अर्थ ‘माता लक्ष्मी’ असा आहे. माता लक्ष्मीच्या अनेक नावांपैकी ‘श्री’ हेदेखील तिचे एक नाव आहे. तसेच या शब्दाचा अर्थ ‘ऐश्वर्य मिळवून देणारी’ असा आहे. माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे हे आपण जाणतोच, म्हणून श्रीहरी म्हणत आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना एकाच रूपात आदर देतो.

- Advertisement -

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या नावात ‘श्री’ का वापरला जातो?

आता तुम्ही विचार करत असाल की भगवान विष्णूच्या नावासमोर श्री हा शब्द वापरला जातो, कारण देवी लक्ष्मी त्यांची पत्नी आहे. पण भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या नावात ‘श्री’ हा शब्द का वापरला जातो? तर धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान राम आणि कृष्ण यांना विष्णूचे अवतार मानले गेले आहे. म्हणूनच त्यांना संबोधण्यापूर्वी श्री वापरला जातो. त्याचबरोबर मुख्य मुद्दा असा आहे की, वेदांमध्ये श्रीरामाची पत्नी सीता आणि श्रीकृष्णाची पत्नी माता रुक्मिणी यांचेही वर्णन लक्ष्मीजींचे अवतार म्हणून केले आहे. त्यामुळेच ‘श्रीराम’ आणि ‘श्रीकृष्ण’ यांचा वापर केला जातो.


हेही वाचाः कधी आहे श्रीदत्त जयंती? जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि तिथी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -