घरभक्तीआज आहे श्रीदत्त जयंती; जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि तिथी

आज आहे श्रीदत्त जयंती; जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि तिथी

Subscribe

मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमे दिवशी श्रीदत्त जयंती साजरी केली जाते. श्रीदत्तात्रयांमध्ये भगवान विष्णू यांचा अंश असल्याचे म्हटले जाते. यंदा बुधवार, 7 डिसेंबर 2022 रोजी श्रीदत्त जयंती साजरी करण्यात येईल. पौराणिक कथांनुसार, श्रीदत्त यांनी त्रिमूर्ती देखील म्हटले जाते. तसेच त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश अवतार मानले जाते. त्यांची पूजा-आराधना केल्याने भक्ताची सर्व संकटातून मुक्ती होते.

श्रीदत्त जयंती पूजा मुहूर्त
श्रीदत्त जयंती बुधवार, 7 डिसेंबर 2022 रोजी श्रीदत्त जयंती साजरी करण्यात येईल.
7 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8:01 पासून
8 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 9.37 पर्यंत असेल.

- Advertisement -

पूजा विधी

  • श्रीदत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • घराच्या पूर्वेकडे किंवा ईशान्येला चौरंग ठेवून त्यावर श्रीदत्तात्रयांचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करावी.
  • श्रीदत्तात्रांनी गंध लावून पिवळे फुल अर्पण करावे. धूर-दीप अर्पण करावा.पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
  • श्रीदत्तात्रयांच्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे मनोभावे पठण करावे.
  • शक्य असल्यास या दिवशी तुम्ही दत्त मंदिरात देखील जाऊ शकता.

श्रीदत्तात्रयांबद्दल काही खास गोष्टी

- Advertisement -

  • श्रीमद्भागवत पुराणानुसार, श्रीदत्तात्रय यांचा जन्म महर्षि अत्री आणि माता अनुसूया यांच्या घरामध्ये झाला. महर्षि अत्री आणि अनुसूया श्रीदत्तात्रयांचे माता-पिता आहेत.
  • असं म्हणतात, श्रीदत्तात्रयांमध्ये तीन देवांचा वास आणि दोन गुरु देखील आहेत. त्यामुळे त्यांना श्री गुरुदेवदत्त देखील म्हटले जाते.
  • श्रीदत्तात्रयांचे तीन मस्तक म्हणजेच सत्, रज आणि तम यांचे प्रतीक आहे.तसेच त्यांचे सहा हात म्हणजे नियंत्रण, नियम, समानता, सामर्थ्य आणि दया याचे प्रतिनिधित्व करतात.
  • श्रीदत्तात्रयांमध्ये शैव, वैष्णव, शाक्त, तंत्र, नाथ, दशनामी आणि त्यांच्याशी जोडलेले अनेक संप्रदयांचा समावेश आहे. यांचे तीन प्रमुख शिष्य होते त्यामध्ये दोन योद्धा जातीतील तर एक असूर जातीतील होते.
  • महादेवांचा ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेयाला दत्तात्रेयांनी शिक्षण दिले आहे. भक्त प्रल्हादला शिक्षण देऊन उत्तम राजा बनवण्याचे श्रेय देखील भगवान दत्तात्रेय यांना जाते.

हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -