घरताज्या घडामोडीLive Update: महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Live Update: महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Subscribe

महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. वय वर्ष १८ ते ४४ अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात १ मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात ५ कोटी ७१ लाखांहून अधिन नागरिक आहेत. यासाठी तब्बल १२ कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर ६ हजार ५०० कोटी रुपयांचा भार असणार आहे.


दीड तास कॅबिनेट बैठक सुरु, मोफत लसीकरणावर होणार निर्णय.

- Advertisement -

लॉकडाऊन अजून १५ दिवस वाढवण्याची अनेक मंत्र्यांची मागणी

काँग्रेसच्या मंत्र्यांचा सरसकट सर्वांना मोफत लसीकरणाचा आग्रह

- Advertisement -

१५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता?


माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. काँग्रेसचा विचार मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात गायकवाड साहेबांचा सिंहाचा वाटा होता – जयंत पाटील


काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खा. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक हरपला असून आपण एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावले आहेत – नाना पटोले


मितभाषी असलेले एकनाथ गायकवाड नेहमी जनसामान्यांमध्ये राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे जनसामान्यांचा कैवारी गेला आहे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खा. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे निष्ठावान अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे – बाळासाहेब थोरात


भारतात कोरोना लसीकरण तिसरा टप्पा, गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेत गृह विभागाची दुपारी ४ वाजता बैठक होार आहे. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, पीयूष गोएल यांची उपस्थित असणार आहेत.


गोव्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  गोव्यात ५ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीला सुरूवात झाली आहे. मंत्रीमंडळाची ही कॅबिनेट बैठक खूप महत्त्वाची ठरणार आहे. आजच्या बैठकीत मोफत लसीबाबतातचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत काल मंत्री विजय वेडेट्टीवार यांनी दिले होते. लॉकडाऊन वाढवण्याबाबत आज कॅबिनेटमध्ये निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.  त्यामुळे मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं. ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी १० वाजता गायवकवाड यांचं निधन झालं. एकनाथ गायवाड हे माजी खासदार तसंच मुंबईचे काँग्रेसचे प्रभारी राहिले आहेत. तसंच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.


देशात गेल्या २४ तासात ३ लाख २० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ३ हजार २९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या २९ लाख ७८ हजार ७०९ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


बुधवारी पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास आसाम व पश्चिम बंगालच्या काही भागात भुकंपाचे धक्के बसले आहेत. भुकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली. आसाममधील सोनितपूर हे भुकंपाचे मुख्य केंद्र बिंदू असल्याचे सांगितले जात आहे.


मुंब्रा कौसाच्या प्राईम रूग्णालयालाच्या आगीतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना १ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


बुधवारी मध्यरात्री ३:४० वाजता मुंब्राच्या कौस येथील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयाला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत लागल्याची माहिती समोर येत आहे. प्राईम रुग्णालयात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. त्यातील ४ जाणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शमीम (५८) आणि यास्मिन सिद्दिकी (५२), हलीमा सलिमानी, श्री सोनावणे या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -