घरताज्या घडामोडीविजेची तार अंगावर पडून ८ जनावरांचा मृत्यू

विजेची तार अंगावर पडून ८ जनावरांचा मृत्यू

Subscribe

गुरे मालकांच्या घरातही एक प्रकारचा सन्नाटा पसरला.

मुरुड तालुक्यातील भोईघर गावानजीक शेतामध्ये गुरे चरत असताना अचानक त्यांच्या अंगावर जिवंत वीज वाहिनी पडल्याने यात ८ पाळीव गुरांचा जागीच मृत्यू झाल्या. या घटनेनंतर एका बाजूला हळहळ, तर दुसर्‍या बाजूला महावितरणच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. दगावलेल्या गुरांमध्ये ३ गाई, ४ बैल आणि एका वासराचा समावेश आहे. यात केशव कासार यांची ३, सचिन महागावकर २, तर महेंद्र कदम, प्रफुल्ल वाघे आणि पिटर पेय यांच्या प्रत्येकी एका गुराचा समावेश आहे. ही गुरे नेहमीप्रमाणे चरत असताना दुर्घटना घडली. एकावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू झाल्याचे समजताच एकच हलकल्लोळ उडाला. गुरे मालकांच्या घरातही एक प्रकारचा सन्नाटा पसरला. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन पाडावे यांनी मृत गुरांचे विच्छेदन केले. यात विजेच्या धक्क्याने सर्वांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या प्रकरणाची रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, काही महिन्यापूर्वी सुद्धा अशीच घटना बोर्ली भागात घडल्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने महावितरणच्या गलथान आणि निष्काळजी कारभाराबद्दल कमालीचा संताप व्यक्त होत आहे. नुकसान झालेल्या गुरांच्या मालकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या संदर्भात तालुक्याचे प्रभारी उप कार्यकारी अभियंता महेंद्र राठोरा यांच्याशी संपर्क साधला असता ज्यांची गुरे दगावली त्यांना महावितरणकडून निश्चितपणे नुकसान भरपाई मिळणार असल्याचे स्पष्ट केले. शव विच्छेदन अहवाल आणि प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयाकडे सत्वर पाठविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेकानं शुद्धीकरण, नारायण राणेंनी घेतलं होतं दर्शन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -