घरक्राइमNCBची मुंबईत मोठी कारवाई; रजाईतून ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणारे ड्रग्स जप्त

NCBची मुंबईत मोठी कारवाई; रजाईतून ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणारे ड्रग्स जप्त

Subscribe

ड्रग्स प्रकरणात मुंबईसह महाराष्ट्रात एनसीबीची कारवाई सातत्याने सुरू आहे. एनसीबीने आज मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळाच्या कार्गो येथून एनसीबीचे झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने ५ किलो ड्रग्स जप्त केले आहेत. चादरीच्या आतमध्ये ड्रग्सची पट्टी बनवून ती ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे पाठवली जात होती. त्याच वेळेस एनसीबीने कारवाई करून अफेड्रींग आणि मेटाफेतिमाईन हे ड्रग्ज जप्त केलं आहे.

अफेड्रींग आणि मेटाफेतिमाईन हे ड्रग्स भारतात बनवले जाते. प्रामुख्याने आंध्र प्रदेशात हे ड्रग्स बनवून मुंबई मार्गे परदेशात पाठवलं जातं होतं. गेल्या काही दिवसांत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पाचवी कारवाई केली आहे. या पाचव्या कारवाईत आतापर्यंत १० किलो ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे.

- Advertisement -

एएनआयच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले ड्रग्स हैदराबादहून मुंबईकडे आणले गेले होते आणि ते ऑस्ट्रेलियाला पाठवले जात होते. यापूर्वीच एनसीबीने मोठी कारवाई करून हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान ३० सप्टेंबरला विश्वसनीय सूचनेच्या आधारावर एनसीबी मुंबईच्या एका पथकाने एक शिपमेंट जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित साहित्य पार्सलच्या रुपात एका कार्टन बॉक्समध्ये पॅक केलेले तीन रजाईच्या आत लपवले गेले होते. तपासा दरम्यान सर्व रजाईमधून प्रतिबंधित साहित्य जप्त केले गेले. एनसीबी आता पुढील तपास करत आहे.


हेही वाचा – लोअर परळ पुलावर यु-टर्न मारताना झालेल्या अपघातात २ दुचाकी स्वारांचा मृत्यू, कार चालकला अटक


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -