तहान लागल्याचे कारण देत नवरी झाली फरार

bride escaped after cheating husband after marriage in mainpuri
तहान लागल्याचे कारण देत नवरी झाली फरार

लग्नानंतर पाठवणी करून सासरी जात असलेल्या नववधूने पतीला चांगलाच चकमा देऊन पळ काढल्याची घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरीमध्ये घडली आहे. बराच शोध घेतल्यानंतरही नववधू काही सापडली नाही. पीडित तरुणाने आणि त्याच्या वडिलांनी कोतवाली पोलिसात एका महिलेवर आणि तरुणीवर फसवणूक केल्याचा आरोप केला असून कारवाईची मागणी केली आहे.

जेव्हा तरुण पाठवणी झाल्यानंतर बस स्टँडवर पोहोचला. तेव्हा तरुणी नवऱ्याचा हातावर तुरी देऊन रोख आणि दागिने घेऊन पसार झाली. यामुळे पीडित नवरा सदम्यात गेला. माहितीनुसार, शहरातील करहल चौकाजवळ राहणाऱ्या तरुणीने कस्बा बेवार येथे राहणाऱ्या तरुणासोबत लग्न केले होते.

ठाणा बेवार परिसरातील परौंखा गावाचा रहिवासी राजेंद्र यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना विचारले की, त्याच्या नजरेत एक मुलगी आहे. तर आपला मुलगा राजूसोबत तिचे लग्न लावू इच्छित आहात का? तेव्हा राजेंद्रने लग्नासाठी लगेच होकार दिला. त्या व्यक्ती सांगितले की, मुलीला ८० हजार रुपये द्यावे लागतील. मग दोघांमध्ये हे प्रकरण मिटले.

त्यानंतर शहरातील करहल चौकाजवळ राहणाऱ्या एका महिलेने ठरलेली रक्कम घेतल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी राजूचे त्या मुलीशी लग्न केले. संध्याकाळी राजू आपल्या नववधूला घेऊन घरी जात होता. जेव्हा तो बेवर बस स्टँडवर पोहोचला तेव्हा पत्नीने तहान लागली असल्याचे सांगितले. त्यामुळे राजू पाणी आणायला गेला. पण परत येताच पाहिलं तर पत्नी गायब झाली होती. खूप शोध घेतल्यानंतरही ती काही सापडली नाही. मग राजूचे वडील राजेंद्र यांनी बेवर ठाण्यात तक्रार दाखल केली. करहल रोड जवळील राहणारी महिला आणि तरुणीने फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी पीडित तरुणाने तक्रार दिली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.


हेही वाचा – दुचाकी अडवून कारमध्ये महिलेवर बलात्कार