घरCORONA UPDATECorona Live Update: दिलासादायक बातमी; मागच्या २४ तासांत फक्त ६ टक्के रुग्ण...

Corona Live Update: दिलासादायक बातमी; मागच्या २४ तासांत फक्त ६ टक्के रुग्ण वाढले

Subscribe

भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत जात असताना आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते आज शनिवारी ८ वाजेपर्यंत भारतात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये फक्त ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात कोरोनाचे १०० रुग्ण आढळल्यापासून ही आतापर्यंतची सर्वात कमी वाढ ठरली आहे.


महाराष्ट्रासह संपुर्ण देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटातून सावरण्यासाठी आणि या अदृष्य विषाणू विरूद्ध लढाई जिंकण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचे आवाहन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत ग्रुपने राज्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये ५० लाख रूपयांचे योगदान दिले आहे.

- Advertisement -

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप झालेले प्रा. आनंद तेलतुंबडेंना मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने आज हंगामी जामीन नाकारला आहे. त्यामुळे त्यांची आता ८ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूचा विळखा अधिकच घट होताना दिसत आहे. देशभरात २४ तासांत ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ४२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २४ हजार ५०६ वर गेली असून सध्या १८ हजार ६६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ५ हजार ०६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७७५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. (सविस्त वाचा)

- Advertisement -

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्याचा लॉकडाऊन जूनपर्यंत वाढेल

मुंबई, पुण्यासारख्या शहरांची कोरोनासंबंधीची सद्यपरिस्थिती पाहता हा लॉकडाऊन जूनपर्यंत वाढवावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय ठाणे आणि नवी मुंबई यांनाही लॉकडाऊनचा कालावधी वाढवून दिला जाईल, असे सांगितले जात आहे. राज्य सरकारने मुंबई, पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या शहरांची स्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. येथील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. तर राज्यात मुंबई, पुण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा स्थितीत या शहरांचा लॉकडाऊन कालावधी वाढवला जाईल यात शंका नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. (सविस्तर वाचा)


महापालिकेच्या आपत्कालिन कक्षात आणखी तीन कोरोनाग्रस्त

मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षातील दोन कामगारांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीमध्ये अजून तीन जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे तिन्ही कामगार हाऊस किपिंग करणारे कामगार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयातच एकूण पाच कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळून आले असून एरव्ही एखाद्या इमारतीमध्ये एक जरी रुग्णालय आढळून आला तर संपूर्ण इमारत सिल केली जाते. परंतु महापालिका मुख्यालयात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळूनही मुख्यायालयातील कारभार सुरुच आहे. (सविस्तर वाचा)


यवतमाळमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण संख्या १५ वर

वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण १५ वर गेली आहे. हा व्यक्ति सुरवातीच्या ६ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या थेट संपर्कात आला होता आणि काही दिवसांपासून संस्थात्मक विलागिकरणात भरती होता. त्याचा रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला रात्री उशिरा प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


मातोश्री जवळील चहावाल्याची कोरोनावर मात

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर असलेल्या चहावाल्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या चहावाल्यांनी कोरोनावर मात केली असून हा चहावाला बरा होऊन घरी परतला आहे.


कोल्हापूरकरांना दिलासा; २६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोना संशयित रुग्णांच्या बाबत आजचा दिवस कोल्हापूरकरांना दिलासा देणारा ठरला आहे. आज सकाळी एकूण २६ रिपोर्ट मिरज येथून प्राप्त झाले आहेत. हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातुन देण्यात आली.


नागपुरात आणखी एक करोना रुग्ण

नागपुरात आणखी एक कोरोना रुग्ण सापडला आहे. एका २४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. मेयो रुग्णालयात सारीच्या आजारावर हा तरुण उपचार घेत होता. सतरंजीपुरा कनेक्शन असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.


औरंगाबादमध्ये आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील तीन महिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या ४५ वर गेली असून मृतांची संख्या ५ वर गेली आहे. (सविस्तर वाचा)


जळगाव येथील कोविड – १९ रूग्णालयात गेल्या तीन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्ती पैकी ३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील पाच व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.


आजपासून देशभरात दुकानं उघडणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा सोडता इतर सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, दुकाने, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला. काही अटींसह सरकारने आता दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

दुकानांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

१. ग्रामीण भाग : शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकानांना मुभा
२. शहरी : शॉपिंग मार्केट किंवा मार्केट कॉम्प्लेक्स मॉल्स वगळता इतर दुकानांना मुभा
३. ई कॉमर्स वरून केवळ जीवनावश्यक वस्तूंना परवानगी
४. दारू विक्रीला बंदी कायम


कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच अनेक राज्य सरकारांची चिंता वाढली असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून ३ दिवसांनी वाढून तो १० दिवसांवर गेला आहे. (सविस्त वाचा)


गेल्या २४ तासांत देशात करोनाची लागण झालेले ४१९ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच देशात एकूण ४ हजार ८१४ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील करोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाणही २०.५७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.


राज्यात हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर

जगासह देशभरात करोनाचा कहर थांबताना दिसत नाही. त्यामुळे करोना रूग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र अशा परिस्थितीत दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोनाच्या फैलावामुळे राज्यात सुरूवातीला करोनाची १४ धोकादायक हॉटस्पॉट ठिकाणे होती. परंतु या हॉटस्पॉटमधील करोना बाधित रूग्णांवर योग्य उपचार झाल्याने या क्षेत्रातील रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. त्यामुळे राज्यातील हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -