घरताज्या घडामोडीमोफत लसीकरण : शेतकरी कामगार पक्षातर्फे १ सप्टेंबरपासून विशेष उपक्रम

मोफत लसीकरण : शेतकरी कामगार पक्षातर्फे १ सप्टेंबरपासून विशेष उपक्रम

Subscribe

लसीकरण मोहिमेला तोडकरी हॉस्पिटल येथे सुरुवात होणार आहे.

कोरोनाचे सावट जरी कमी होत असले तरी, सर्वांना लस घेणे गरजेचे आहे. भारतात लसींचा तुटवडा आहे त्याचप्रमाणे कोरोनाचे हॉट्सपॉट असणाऱ्या अलिबागमध्येही लसींचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षातर्फे १ सप्टेंबरपासून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण अलिबागमधील तोडकरी हॉस्पीटलमध्ये होणार आहे. ह्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीची असणार आहे. रोज १०० लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अलिबाग तालुका कोविडमुक्त होण्यासाठी शेतकरी कामगार पक्षामार्फत मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लसीकरण मोहिमेला बुधवारी १ सप्टेंबर पासून तोडकरी हॉस्पिटल येथे सुरुवात होणार आहे. या लसीकरण मोहिमेत गावानुसारच लस देण्यात येणार असल्याने त्यानुसार संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

एका दिवसाला एक गाव निवडण्यात येणार आहे. प्रत्येक गावाला प्रतिनिधी नियुक्त करण्यात आला आहे. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर लाभार्थ्यांना कोविड लसीचा डोस मिळणार आहे. त्याचबरोबर मोफत बससेवा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पीएनपीच्या बस गावा गावात येऊन लाभार्थ्यांना तोडकरी लसीकरण केंद्रावर घेऊन येतील आणि लसीकरण पुर्ण करतील. हा उपक्रम दोन तीन महिने सुरु ठेवण्यात येणार आहे. चित्रलेखा पाटील यांनी प्रत्येकाने शिस्तपध्दतीने या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – आशीर्वाद कशाला हवेत, जनतेचा जीव घ्यायला?, मुख्यमंत्र्यांचा जन आशीर्वाद यात्रेवरुन हल्लाबोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -