घरक्राइमGmail Alert : जर तुम्हालासुद्धा omicronचा 'हा' ईमेल आला असेल, तर सावधान!...

Gmail Alert : जर तुम्हालासुद्धा omicronचा ‘हा’ ईमेल आला असेल, तर सावधान! ; वाचा, काय आहे प्रकार

Subscribe

कोविड-१९ चा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन हा जगभरात वेगाने पसरत आहे.आता या व्हायरसने जीमेलचा खतरा वाढवला आहे. जगातील अनेक देशांमध्ये या व्हायरसचा प्रभाव दिसून येत आहे. त्यातच आता सायबर गुन्हेगार कोणा ना कोणाला तरी अडकवण्याची संधीच शोधत असतात.त्यांनी या सायबर क्राइममध्ये ओमिक्रॉन व्हायरसलाही सोडले नाही.बनावट ओमिक्रॉन चाचणीसह गुन्हेगार ईमेलद्वारे सायबर हल्ले करत आहेत. यूके-आधारित सुरक्षा फर्म इंडिव्हिज्युअल प्रोटेक्शन सोल्युशन्स (IPS) ने लोकांना ईमेल फिशिंग हल्ल्यांच्या नवीन सीरीजबाबत चेतावणी दिली आहे.

या बनावट ईमेल मॅसेजमध्ये सांगितले आहे की,’नवीन पीसीआर चाचणी ओमिक्रॉन व्हेरिएंट ओळखून तुम्हाला आयसोलेट न केल्याशिवाय सुरक्षित आणि मुक्तपणे प्रवास करण्याची अनुमती देईल.ई-मेल वापरकर्त्यांनी विलंब न करता ओमिक्रॉनची पीसीआर चाचणी बुक करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगितले आहे.’ असे, या बनावट मेल मधून सांगितले जात असून,या प्रकारचा फिशिंग मेल केवळ तुमची वैयक्तिक माहिती तसेच,बॅंकेचे सर्व तपशील चोरण्यासाठी केले जात आहेत.

- Advertisement -

ईमेलमध्ये युजर्सना ऑमिक्रॉनच्या पीसीआर चाचणीची रिक्वेस्ट करण्यात येत असून, या चाचणीसाठी युजर्सनी लिंकवर क्लिक केले तर,त्यात तुम्हाला तुमचे नाव,अॅड्रेस आणि बॅंकेचे तपशील याची माहिती देण्याचे सांगितले आहे.हा स्कॅम हेल्थ इमरजंसीमधील लोकांचा पैसा चोरण्यासाठी करण्यात आला आहे. या स्कॅमला खतरनाक समजले जात आहे कारण ज्यावेळेस कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनची एंट्री झाली त्यावेळे अनेक लोकांना याबाबत माहिती नसताना, याच लोकांना शिकार करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगारांनी केला आहे.त्यामुळे अनेक लोक या ओमिक्रॉनच्या संकटापासून वाचण्यासाठी आणि आपल्यावर येणारा धोका टाळण्यासाठी या ईमेलव्दारे आलेल्या लिंकला बळी पडत आहेत.त्यामुळे या जीमेलपासून सावध राहण्याची जबाबदारी प्रत्यकाने घेणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे रहा सुरक्षित 

  • सर्वांत प्रथम गोष्ट म्हणजे NHS म्हणजे नॅशनल हेल्थ सर्व्हिस अशाप्रकारचे कोणतेही मॅसेज कींवा कॉल करत नाहीत.
  • तरीसुद्धा तुम्हाला असे मेल येत असतील तर,ई-मेल पाठवणाऱ्याचा अॅड्रेस चेक करा.
  • खऱ्या NHS  ईमेलच्या अॅड्रेसचा शेवट nhs.uk असा आहे.
  • त्यामुळे तुम्ही कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळले पाहिजे.
  • याशिवाय एखाद्या ऑनलाइन फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरणे शक्यतो टाळा.
  • आतापर्यंत या ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचे डिटेक्शन होण्याची कोणतीही अधिकृत चाचणी उपलब्ध नाही त्यामुळे साहजिकच अशा लिंक बनावटच असतात.
  • जर तुम्हाला असा बनावट मॅसेज आला असेल तर, तो ईमेल त्वरित डिलीट करा.

हे ही वाचा – धक्कादायक घटना! पब्जी-फ्री फायरची उधारी चुकवण्यासाठी आपल्या लहान भावाचीच केली निर्घृण हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -