घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव

महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव

Subscribe

बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव आखला गेल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबई पोलिसांना, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला.

सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विष आढळून आले नसल्याचे एम्सच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू होता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, तरीही मुंबई पोलिसांना नाहक बदनाम करण्यात आले. बिहारमधील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एका राष्ट्रीय पक्षाने महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

- Advertisement -

भाजपचे नाव न घेता त्यांनी हा आरोप केला. बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत प्रकरण पुढे नेण्यात आले. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा डाव आखण्यात आला. अनेकांवर आरोप करण्यात आले. मुंबई पोलीस काही जणांना वाचवत असल्याचे आरोप केले गेले. बिहारचे डीआयजी गुप्तेश्वर पांडे यांचाही यामध्ये उपयोग करून घेण्यात आला. आता पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे, असे देशमुख म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -