घरताज्या घडामोडीधावपटू साक्षी दाभेकरला मदतीची गरज

धावपटू साक्षी दाभेकरला मदतीची गरज

Subscribe

शेजारच्या बाळाला वाचविताना गमावला पाय

पोलादपूर येथून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या केवनाळे गावावर महाकाय दरड कोसळली. त्यानंतर शेजारच्या घरातील दोन वर्षांच्या बाळाळा वाचविताना धावपटू असलेल्या १५ वर्षीय साक्षी दाभेकर हिला आपला पाय गमवावा लागला. तिचे आजचे वय आणि पुढील भवितव्य लक्षात घेऊन तिला आता आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.

२२ जुलै रोजी मागच्या बाजूला असलेला डोंगर घरावर कोसळत असतानाच शेजारच्या ५० वर्षीय राम आंगोंडे काकायांनी दिलेली हाळी बाहेर पडवीत बसलेल्या साक्षीने ऐकली आणि बाहेर पडत असतानाच शेजारच्या दोन महिन्याच्या चिमुरड्याचे रडणे तिला कानी पडले अन् ती त्या बाजूला वार्‍यासारखी धावली. तिने बाळाला उचलले आणि पुन्हा माघारी धावत असताना दरडीचा एक मोठा दगड तिच्या पायावर आला अन ती खाली कोसळली. जीवाच्या आकांताने मारलेल्या किंकाळीचा आवाज ऐकून थोरली बहीण प्रतीक्षा तिच्या दिशेने धावली. तिने वडील आणि इतरांच्या मदतीने दगड बाजूला करून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावर आणले. तेथून तिला तातडीने येथील शासकिय रुगणालयात नेण्यात आले. मात्र दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्याने प्रथमोपचार करून मुंबईला हलविण्यात आले.

- Advertisement -

सध्या परळ येथील केईएम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून, साक्षी हिला पाय गमवावा लागला आहे. तिच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबई महानगरपालिका धावून आली असली तरी एका दुर्गम भागात वास्तव्य असलेने पुढच्या भवितव्याचे काय, असे भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे आहे. उत्तम धावपटू होण्याचे स्वप्न उराशी उराशी बाळगलेल्या साक्षीचे भावी जीवन अंधारमय झाले आहे. तिला आत्मनिर्भर होण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. ज्यांना तिच्यासाठी आर्थिक मदत करायची असेल त्यांनी प्रतीक्षा नारायण दाभेकर, बॅक ऑफ इंडिया पोलादपूर शाखा, खाते क्रमांक १२०३१०५१०००२८३९, आरएफसी कोड बीकेआयडी ०००१२०३ येथे पैसे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

– बबन शेलार

- Advertisement -

हेही वाचा – मराठी मुलांना नोकरी नसल्याच्या जाहिरातीवरून मनसे संतप्त; कंपनीने मागितली माफी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -