म्हसळे,श्रीवर्धनमध्ये कृषी बाजारपेठ उभारणार – खासदार सुनील तटकरे

आधुनिक शेतीवर भर देण्याचे आवाहन

After Marine Highway in Shrivardhan, tourism will get more boost - Sunil Tatkare
श्रीवर्धनमध्ये सागरी महामार्गानंतर पर्यटनाला अधिक चालना मिळेल - सुनील तटकरे

शेती आणि शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.यंदाचा खरीप हंगाम संपताच म्हसळे आणि श्रीवर्धनमध्ये भात खरेदी आणि विक्री केंद्र कार्यान्वित करण्यात येईल, तसेच विविध प्रकारच्या कृषी मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल, अशी सुस्पष्ट ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे बबन मनवे यांनी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी मेळाव्याचे आयोजन येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात केले होते. यात शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.आधुनिक शेतीवर भर देण्याचे आवाहन करतानाच तटकरे यांनी काजू, आंबा लागवड करण्यासाठी शासनाची १०० टक्के अनुदानित योजना स्वीकारण्याच आवाहन केले. रायगड जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून किमान १०० शेतकर्‍यांना बारामती येथे होणार्‍या कृषी प्रदर्शन कार्यक्रमात घेऊन जावे त्यासाठी लागणारी मदत करू,असेही ते म्हणाले.

यावेळी पंचायत समितीच्या सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, सदस्य मधुकर गायकर, माजी सभापती उज्ज्वला सावंत आणि महादेव पाटील, ज्येष्ठ नेते अली कौचाली, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर बनकर, नाझिम हसवारे, अंकुश खडस, दिवेआगर सरपंच उदय बापट, शहराध्यक्ष रियाज घराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी, प्रास्ताविक सभापती मनवे यांनी केले. मेळाव्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आरले, डॉ. माधव गीते, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील, शेतकरी राजेंद्र मोहिते, प्रगतशील शेतकरी रसिका पाठक यांनी मार्गदर्शन केले. आभार गट विकास अधिकारी वाय. एम. प्रभे यांनी मानले.


हे ही वाचा – संजय राऊतांनी सव्वा रुपयांची किंमत वाढवावी, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर