घरठाणेउल्हासनगरची पुनरावृत्ती ठाण्यात; कळव्यात स्लॅब कोसळून तिघे जखमी

उल्हासनगरची पुनरावृत्ती ठाण्यात; कळव्यात स्लॅब कोसळून तिघे जखमी

Subscribe

उल्हासनगर येथे वारंवार इमारतीमधील वरील मजल्यावरील स्लॅब खाली मजल्यावर कोसळल्याच्या घटना ताज्या असताना, त्याच उल्हासनगरची पुनरावृत्ती कळव्यातील विक्रांत सोसायटीत सोमवारी सकाळी पाहण्यास मिळाली. विक्रांत या ३८ वर्षे जुन्या इमारतीमधील पहिला मजल्यावरचा स्लॅब तळ मजल्यावर असलेल्या सलुनमध्ये पडला.

ठाणे: उल्हासनगर येथे वारंवार इमारतीमधील वरील मजल्यावरील स्लॅब खाली मजल्यावर कोसळल्याच्या घटना ताज्या असताना, त्याच उल्हासनगरची पुनरावृत्ती कळव्यातील विक्रांत सोसायटीत सोमवारी सकाळी पाहण्यास मिळाली. विक्रांत या ३८ वर्षे जुन्या इमारतीमधील पहिला मजल्यावरचा स्लॅब तळ मजल्यावर असलेल्या सलुनमध्ये पडला. या घटनेत आयुष जानू धामने (२०) आणि कादिर सलमानी (१९) तसेच सलून मध्ये केस कापण्यासाठी आलेला पार्थ निलेश पाटकर (१६) हे तिघे जखमी झाले. त्या तिघांना उपचारार्थ कळव्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या हाताला, डोळ्याला, पाठीला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. (Three injured in slab collapse in Kalva)

कळवा मनिषा नगर गेट क्रमांक-०१, येथे तळ अधिक ३ मजली विक्रांत/४३ इमारत ही ३८ वर्षे जुनी आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक-१०६ हे गणेश जानू धामणे यांच्या मालकीचे आहे. त्याच रूमचा स्लॅब तळ मल्यावरती असलेल्या मे. ग्लोबल ब्युटी सलूनमध्ये पडला. हे सलून हरून सलमानी हकीम यांच्या मालकीचे आहे.

- Advertisement -

सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कळव्यात पहिल्या मजल्यावरील स्लॅब तळ मजल्यावर असलेल्या सलूनमध्ये पडला अशी माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि मुख्य अग्निशमन अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान तसेच कळवा पोलिस, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी धाव घेतली.

या घटनेत आयुष जानू धामने याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून सलून मध्ये काम करणारा कादिर सलमानी याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच त्या सलून मध्ये केस कापण्यासाठी आलेला १६ वर्षीय पार्थ निलेश पाटेकर हा जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. त्यांना कळव्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.

- Advertisement -

इमारत केली खाली

सहा दुकानांसह प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी सहा – सहा रूम आहेत. असे २४ रूम आणि सहा दुकाने असून ही इमारत ३८ वर्षे जुनी आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून उप-आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशानुसार त्या इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा दुकाने व पहिल्या मजल्यावरील स्लॅब पडलेला रूम बंद करण्यात आला असून, संपुर्ण इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर खाली करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.


हेही वाचा – राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -