घरमहाराष्ट्रएसटीच्या ताफ्यात आता दाखल होणार इलेक्ट्रिक शिवाई बस

एसटीच्या ताफ्यात आता दाखल होणार इलेक्ट्रिक शिवाई बस

Subscribe

आपली लालपरी आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (एसटी) लवरकच पर्यावरणपूरक ताफ्यात दाखल करणार आहे. लालपरी 1 जून रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळ आपल्या ताफ्यात पहिली शिवाई इलेक्ट्रिक बस दाखल करणार आहे. या बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

एसटीचे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण –

- Advertisement -

पुणे येथे 1 जून रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यानंतर ही बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. या सोहळ्याला सर्व एसटी प्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे अनिल परब यांनी अहवान केले आहे.यावेळी त्यांनी 1 जून, 1948 रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी 1 जून रोजी एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपली एसटी सुद्धा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, अशा शब्दात मंत्री अनिल परब यांनी आनंद व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण –

- Advertisement -

1 जून 1948 रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती. त्यापार्श्वभूमिवर बुधवारी, पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमानंतर ही बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावनार आहे. दरम्यान, अहमदनगर येथूनही शिवाई बस सुटणार आहे. ही बस पुण्यापर्यंत धावेल. 1 जून 1948 रोजी अहमदनगर येथून धावलेल्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे, असेही परब यांनी सांगितले.

टप्प्याटप्याने होणार इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल –

इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदुषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला, असे परब यांनी सांगितले. लोकार्पण केल्यानंतर ‘शिवाई’च्या पुणे – अहमदनगर – पुणे मार्गावर दिवसाला 6 फेऱ्या होणार आहेत. यानंतर टप्प्याटप्याने इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -