घरअर्थजगतआरोग्य विम्याबाबतही सरकार घेणार मोठा निर्णय

आरोग्य विम्याबाबतही सरकार घेणार मोठा निर्णय

Subscribe

कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीसाठी आरोग्य विमा असणे गरजेचे असते. एक योग्य आरोग्य विमा कोणत्याही गंभीर आजारामुळे होणारा आर्थिक खर्च भरून काढतो. आता केंद्र सरकार देखील यावर मोठा निर्णय घेणार आहे.आता आरोग्य विमा घेण्याची इच्छा असणार्‍याला लवकरच प्रीमियम हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच आरोग्य विमाधारक मासिक, तिमाही आणि सहामाही आधारावर प्रीमियम जमा करू शकेल. सध्या प्रीमियम हे वार्षिक हप्त्यामध्ये भरावे लागत असे. विमा नियामक इरडाने प्रीमियमच्या हप्त्यासंबंधित परिपत्रक जारी केले आहे. इरडाने परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, हप्त्यामध्ये बदल केल्यामुळे मूळ प्रीमियम आणि शुल्कामध्ये बदल करण्यात येऊ नये. याचबरोबर प्रीमियम मासिक, तिमाही आणि सहामाहीही भरता येऊ शकते.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला यामुळे नवीन विमा सादर करण्यास अधिक सोपे जाईल. तसेच, यामुळे आरोग्य विम्यामध्ये देखील अधिक वाढ होईल. इरडाच्या या नियमाचा फायदा एकदम प्रीमियमची रक्कम भरू न शकणार्‍या विमाधारकाला होईल. तसेच इरडाने परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक देखील विमा घेऊ शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -