घरअर्थजगतनोटाबंदीदरम्यानचे CCTV फुटेज सांभाळून ठेवा! RBI चे सर्व बँकांना आदेश

नोटाबंदीदरम्यानचे CCTV फुटेज सांभाळून ठेवा! RBI चे सर्व बँकांना आदेश

Subscribe

RBI ने बँकांसाठी जाहीर केली नोटीस

RBI Order to Banks: देशात मोदी सरकारने २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर केली. या निर्णयाला आता सह वर्षे पूर्ण होतील. यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ने सर्व बँकांना ८ नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यानचे आपल्या शाखेतील आणि चलन संस्थांचे CCTV फुटेज सांभाळून ठेवा असे आदेश दिले आहे. या आदेशामुळे नोटाबंदीदरम्यान बेकायदेशीर कामात सहभागी व्यक्तींविरुद्ध अंमलबजावणी संस्थेमार्फत कारवाई करण्यात मदत होईल असे जाहीर करण्यात आले आहे.

बँकांनो CCTV फुटेज सांभाळून ठेवा- RBI

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी आणि आणि दहशतवादासाठी वापरण्यात येणारा अवैध्य निधी रोखण्यासाठी ५०० आणि १००० रुपयाच्या नोटांवर बंदी घातली. परंतु या बंद झालेल्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याच्या आणि त्याबदल्यात दुसऱ्या नोटांची देवाणघेवाण करण्याची संधी सरकारने नागरिकांना दिली.

- Advertisement -

SBN ((Specified Bank Notes) बंद केलेल्या नोटा परत घेतल्यानंतर केंद्राने ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जाहीर केल्या. परंतु या नोटाबंदीच्या आदेशानंतर ५००० आणि १००० नोटा बँकांमधून बदलून घेण्यासाठी किंवा आपल्या खात्यात पैसै जमा करण्यासाठी देशभरातील बँकांबाहेर दिवसभर मोठमोठ्या रांगा, गर्दी दिसून आली. परंतु केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक माहितीच्या आधारे नवीन नोटा बेकायदेशीररित्या जमा केल्याप्रकरणांची आता चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना पुढील आदेश येईपर्यंत नोटाबंदीच्या काळातील CCTV फुटेज नष्ट करु नये असे आदेश दिले आहे.

RBI ने बँकांसाठी जाहीर केली नोटीस

RBI ने जाहीर केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, तपास यंत्रणांची प्रलंबित तपास आणि न्यायालयात दाखल झालेल्या अनेक प्रलंबित खटले पाहता सर्व बँकांनी ८ नोव्हेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंतचे आपल्या शाखेतील आणि चलन चेस्टमधील CCTV रिकॉर्डिंग पुढील आदेश येईपर्यंत जपून ठेवा असे आदेश दिले आहेत. यापूर्वी देखील RBI ने असे आदेश दिले होते. दरम्यान ८ नोव्हेंबर २०१६ रोजी तब्बल १५.४१ लाख कोटी रुपये किंमतींच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. परंतु यातील १५.३१ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेत जमा झाले आहेत.

- Advertisement -

Accident Kanpur : कानपूरमध्ये बस आणि टॅम्पोच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू, २० जखमी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -