वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स १ जूनपासून महागणार, इतका भरावा लागणार प्रीमियम

भारतीय विमा आणि नियामक आणि विकास प्राधिकरण ( Insurance and Regulatory and Development Authority of India - IRDAI) ने मोटर वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दर वाढवण्यासाठी मसुदा तयार केला आहे.

Auto accident involving two cars, accident car isolated on white background, conceptual Vector Illustration.

पुढील महिन्यापासून म्हणजेच १ जूनपासून मोठ्या वाहनांसह दुचाकी ( two wheeler) आणि चारचाकी वाहनांचा (four wheeler) थर्ड पार्टी विमा महागणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी (third party insurance) जास्त प्रीमियम (premium) भरावा लागेल. भारतीय विमा आणि नियामक आणि विकास प्राधिकरण ( Insurance and Regulatory and Development Authority of India – IRDAI) ने मोटर वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दर वाढवण्यासाठी मसुदा तयार केला आहे. नवीन दर 1 जून 2022 पासून लागू होणार आहेत.

इन्शुरन्ससाठी इतके पैसे भरावे लागतील

चारचाकी वाहने

प्रस्तावित सुधारित दरांनुसार १000 सीसीच्या खाजगी कारसाठी 2,072 रुपयांच्या तुलनेत 2,094 रुपये नवीन दर असेल. तसेच 1000 सीसी ते 1,500 सीसीमधील खाजगी कारसाठी 3,221 रुपयांच्या तुलनेत 3,416 रुपये दर आकारला जाईल. तर 1,500 सीसीपेक्षा जास्त कार मालकांना 7,890 रुपयांऐवजी 7,897 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

दुचाकी

150 सीसी ते 350 सीसीच्या दुचाकींसाठी प्रीमियम 1,366 रुपये असेल. तर 350 सीसीपेक्षा जास्त दुचाकींसाठी 2,804 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

इलेक्ट्रिक वाहने
30 kW पर्यंतच्या नवीन खाजगी इलेक्ट्रिक वाहनासाठी (EV) तीन वर्षांचा सिंगल प्रीमियम 5,543 रुपये असेल. 30 ते 65 kW अधिक क्षमतेच्या EV साठी  9,044 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. . मोठ्या ईव्हीसाठी तीन वर्षांचा प्रीमियम 20,907 रुपये असेल. 3 kW पर्यंतच्या नवीन ईव्ही दुचाकींसाठी पाच वर्षांचा सिंगल प्रीमियम 2,466 रुपये असेल. त्याचप्रमाणे, 3 ते 7 किलोवॅटच्या दुचाकी वाहनांसाठी प्रीमियम 3,273 रुपये आणि 7 ते 16 किलोवॅटसाठी प्रीमियम 6,260 रुपये असेल. उच्च क्षमतेच्या ईव्ही दुचाकींसाठी पाच वर्षांचा प्रीमियम 12,849 रुपये असेल.

थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स म्हणजे काय?
थर्ड पार्टी म्हणजे तिसरा पक्ष. पहिला पक्ष वाहन मालक असतो. दुसरा वाहन चालक असतो आणि अपघात झाल्यास बळी पडणारा तिसरा पक्ष असतो. सार्वजनिक ठिकाणी अपघात झाल्यास आणि तृतीय पक्षाची जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्यास वाहनाचा मालक आणि त्याचा चालक अशा नुकसानाची भरपाई करण्यास कायदेशीररित्या बांधील आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्या थर्ड पार्टी इन्शुरन्स करतात. नुकसान भरपाईची रक्कम संबंधित विमा कंपनीद्वारे दिली जाते.