घरCORONA UPDATEअरे बापरे! चीनमध्ये कोरोनाचा कम बॅक

अरे बापरे! चीनमध्ये कोरोनाचा कम बॅक

Subscribe

कोरोनाच्या प्रकोपातून सावरणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने धडक दिली आहे. मात्र यावेळी हा व्हायरस वुहानमधून नाही तर इंग्लंडमधून चीनमध्ये आला आहे. इंग्लडमध्ये शिकणारा एक चीनी विद्यार्थी नुकताच मायदेशी परतला. त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला चीनमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पण वुहानला पोहचताच त्याला त्रास होऊ लागला व त्याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. झोऊ ( १६) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

हुबई प्रांतात लॉक़डाऊन हटवल्याचे कळाल्यानंतर झोऊ इंग्लडमधील न्यूकॅसल शहर मार्गे दुबई व तिथून बिजींगमध्ये पोहचला. त्यानंतर तो वुहानला आला. पण येथे आल्यावर त्याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने चीन सरकार अलर्ट झाले आहे. कारण जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग हा वुहानमधून झाला होता. पण आता परदेशातून कोरोना व्हायरस चीनमध्ये येण्याची ही पहिलीच घटना आहे. सध्या चीनमध्ये ६९१ कोरोना रु्गण आहेत व त्यातील अनेकजण बरेही होत आहेत. पण झोऊने नव्याने आणलेल्या कोरोनाने चीन सरकारची झोप उडवली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -