घरक्राइमMumbai Crime News : मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने महिलेसह दोघांची फसवणुक; गुन्हा दाखल

Mumbai Crime News : मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने महिलेसह दोघांची फसवणुक; गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई : मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने एका महिलेसह दोघांची सुमारे बारा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अतुल राठोड ऊर्फ ईश्‍वर देविदास रुढे आणि सचिन तुकाराम खरडे या दोघांविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. (Mumbai Crime News Fraud of two including a woman with the lure of a job in Municipal Corporation Filed a case)

हेही वाचा – Koregaon Bhima विजयस्तंभाच्या स्मारकासाठी शासनाने ‘शंभर’ एकर जमीन संपादीत करावी; आठवलेंची मागणी

- Advertisement -

47 वर्षांची तक्रारदार महिला ही मालाड येथे राहते. डिसेंबर 2021 मध्ये तिची अतुल राठोडशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने त्याची महानगरपालिकेत चांगली ओळख असून तिच्या मुलाला मनपामध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळवून देतो असे सांगितले होते. तिचा विश्‍वास बसावा यासाठी त्याने महिलेला एका तरुणाला नोकरी दिल्याचे पत्र दाखविले होते. त्यामुळे महिलेचा त्याच्यावर विश्‍वास बसला आणि तिने तिच्या मुलाला नोकरी मिळवून देण्याची आरोपीकडे विनंती केली.

आरोपीने नोकरीसाठी साडेसहा लाख खर्च अपेक्षित असल्याचे महिलेला सांगितले. यानंतर महिलेसह तिच्या शेजारी राहणारा व्यक्ती पैसे देण्यासाठी तयार झाले. यानंतर नोकरी लावून देण्यासाठी महिलेसह तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने आरोपीला बारा लाख दहा हजार रुपये दिले. ही रक्कम दिल्यानंतर आरोपींने काही दिवसांनी त्या दोघांना त्यांच्या मुलांचे अपॉईमेंट लेटर आणून दिले. त्यात मनपाच्या स्टॅम्पसह प्रशासकीय अधिकार्‍याची स्वाक्षरी होती. मात्र लेटर मिळवूनही त्या दोघांच्या मुलांना नोकरीवर रुजू करण्यात नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपी अतुलसह त्याचा सहकारी सचिन खरडे हे लवकरच काम होईल, असे वारंवार सांगत होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्या दोन्ही आरोपींनी नोकरी मिळवून दिली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Truck Driver Strike : ट्रक चालकांच्या आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण; पोलिसांकडून गुन्हा दाखल

त्यामुळे महिलेसह तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने आरोपींकडे पैशांची मागणी सुरु केली. मात्र आरोपी अतुलने त्यांना पैसे दिले नाही. नोकरीसाठी त्याने पैसे सचिन खरडे याला दिल्याचे सांगितले. अशा प्रकारे या दोघांनी नोकरीच्या आमिषाने त्यांची बारा लाख दहा हजाराची तसेच मनपाचे बोगस नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणुक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार उघडकीस येताच महिलेने मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या घडलेल्या प्रकाराची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अतुल राठोड ऊर्फ ईश्‍वर रुढे आणि सचिन खरडे यांच्याविरुद्ध मनपाचे बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -