Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवरीने गळफास लावून संपवले आयुष्य

लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवरीने गळफास लावून संपवले आयुष्य

नव्या नवरीने आत्महत्या केल्याने कुटुंबामध्ये अनेक उलट सुलट चर्चा होत आहेत.

Related Story

- Advertisement -

लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवऱ्यामुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या सीकर येथे घडली आहे. लग्न होऊन फक्त दोन दिवस झाले होते. घरच्या खोलीत नव्या नवरीने गळफास लावून आपले आयुष्य संपले. लाल साडीतला मृतदेह कुटुंबियांना घराच्या खोलीत सापडला. नव्या नवरीने आत्महत्या केल्याने कुटुंबामध्ये अनेक उलट सुलट चर्चा होत आहेत. नव्या नवरीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

राजस्थानच्या सीकर शहराच्या मोहल्ला चिडीया टीबामध्ये ही घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी लग्न करून आलेल्या नव्या नवरीने गळफास लावून आत्महत्या केली. लक्ष्मी असे मृत महिलेचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी चिडिया टिबा येथे राहणाऱ्या अनिल हिच्याशी लग्न झाले. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादच्यामध्ये राहणारी लक्ष्मी लग्न करून सीकरमध्ये रहायला आली. लग्नासाठी लक्ष्मीच्या घरचे तिच्या सासरी आले होते. लग्नाचे सगळे विधी उरकताच घरची मंडळी पुन्हा फिरोजाबादला परतली. इकडे लक्ष्मीने लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच गळफास लावून आपले आयुष्य संपवले.

- Advertisement -

नव्या नवरीच्या आत्महत्येच्या बातमीनंतर आजूबाजूच्या परिसारात खळबळ उडाली आहे. नवरीच्या आत्महत्येची बातमी तिच्या माहेरच्या लोकांना कळवळ्यात आली. नवरीच्या घरचे तात्काळ मुलीच्या सासरी येण्यास निघाले. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीसांनी वेळत घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. नवरीच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलीस नवरीच्या दोन्ही घरच्यांची चौकशी करत आहेत.


हेही वाचा – धक्कादायक: आरोपी म्हणाला मी नाही भूताने केली पत्नी व मुलांची  हत्या

- Advertisement -