धक्कादायक! गावी जाण्यास नकार दिल्याने सतंप्त पतीने पत्नीवर केला चाकूने वार

काही दिवसांपासून त्याचा पत्नीसोबत वाद सुरु होता. याच वादातून त्याने पत्नीचा खून केल्याचे सांगितले जात आहे.

पत्नीची निर्घृणपणे हत्या करून त्याने थेट पोलीस ठाण्यात फोन करून ‘साहेब मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे, तुम्ही लवकर या’ असे सांगून पोलिसांना घरी बोलावून पतीने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची खळबळजनक घटना डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका येथे शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. शिवकुमार यादव (४४) असे पतीचे नाव आहे. शिवकुमार हा पत्नी मनीषा (४१) आणि दोन लहान मुलासह डोंबिवली पूर्व शेलार नाका येथील शिल्पा हॉटलेच्या मागे असणाऱ्या हरी म्हात्रे चाळ येथे राहण्यास होता. त्याचा कोळशाचा व्यवसाय होता. काही दिवसांपासून त्याचा पत्नीसोबत वाद सुरु होता. याच वादातून त्याने पत्नीचा खून केल्याचे सांगितले जात आहे.

शुक्रवारी शिवकुमार याने आपल्या पत्नीला गावी जाण्यास सांगतिले मात्र तिने गावी जाण्यास नकार दिला. याच शिवकुमार खूप राग आला त्याच्यात कडाक्याची भांडणेही झाली. त्यांच्यातील भांडणे इतक्या टोकाला गेली की त्याने नवऱ्याने कोणताही विचार न करता भाजी चिरायच्या चाकूने बायकोचा गळा चिरला. हा सर्व प्रकार त्यांच्या लहान मुलाने त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहिला. बायोकाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून शिवकुमार भानावर आला. घाबरलेल्या परिस्थितीत त्याने डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिस ठाण्यात फोन केला. मी कोळसावाला बोलतोय. मी माझ्या पत्नीचा गळा चिरुन तिचा खून केला आहे. मी आता घरीच आहे तुम्ही लवकर घरी या असे आरोपी शिवकुमार याने पोलिसांना सांगितले.

शिवकुमारने दिलेल्या पत्त्यावर पोलीस त्वरित दाखल झाले. टिळक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण जाधव, सपोनि. करोती, चुंबळे यांनी पोलीस पथकांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शिवकुमारच्या ताब्यात घेतले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला पोलिसांनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. टिळक नगर पोलिसांनी शिवकुमार याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण जाधव यांनी दिली.


हेही वाचा – सेक्स करताना अतिउत्साहाने घेतला तरुणाचा प्राण