घरक्राइम50 लाख रुपयांच्या चरससह दोघांना अटक, ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणार होते चरस

50 लाख रुपयांच्या चरससह दोघांना अटक, ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणार होते चरस

Subscribe

काही ड्रग्ज तस्करांना एनसीबीच्या अधिकार्‍यांनी अटक करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला होता. ही कारवाई सुरु असतानाच काहीजण कुरिअरच्या माध्यामतून विदेशात चरसचा साठा पाठविणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती.

सुमारे 50 लाख रुपयांच्या चरससह (hashish) दोघांना नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या (Narcotics Control Bureau) अधिकार्‍यांनी अटक (arrest) केली. भुवाल कांता यादव आणि श्रीकांत अरुण पिंगळे अशी या दोघांची नावे आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने एनसीबी कोठडी सुनावली आहे. हे चरस ऑस्ट्रेलियाला (australia) पाठविण्यात येणार होते.

मुंबई शहरात गेल्या काही दिवसांत कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. अशाच काही ड्रग्ज तस्करांना एनसीबीच्या अधिकार्‍यांनी अटक करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला होता. ही कारवाई सुरु असतानाच काहीजण कुरिअरच्या माध्यामतून विदेशात चरसचा साठा पाठविणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने संबंधित आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच एका संशयितासह कुरिअर एजंट अशा दोघांना या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 किलो 4480 ग्रॅम वजनाचे चरस हस्तगत करण्यात आले आहे. या चरसची किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे.

- Advertisement -

औषधे वॉटर प्युरिफायरच्या आत बनविलेल्या विशेष पोकळीत हा चरस लपवून ठेवण्यात आला होता. येत्या एक-दोन दिवसांत चरस ऑस्ट्रेलिया येथे पाठविण्यात येणार होता. या दोघांच्या चौकशीत या गुन्ह्यांत कुरिअर फ्रेंचायझी मालकाचा सहभाग उघडकीस आला आहे. त्याने कुरिअर एजंटच्या मदतीने पार्सलची तपासणी न करता विदेशात पाठविण्याची तयारी केली होती. अशाच प्रकारे यापूर्वीही काही पार्सल विदेशात पाठविण्यात आली आहे का याचा आता एनसीबीचे अधिकारी तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -