Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग बंगळुरुमध्ये पार्टी पडली महाग, एकाच इमारतीत १०० जण कोरोना पॉझिटीव्ह

बंगळुरुमध्ये पार्टी पडली महाग, एकाच इमारतीत १०० जण कोरोना पॉझिटीव्ह

Related Story

- Advertisement -

देशात गेल्या वर्षभरात कोरोनाने थैमान घातले. त्यानंतर कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला. मात्र आता कोरोनाचा विषाणू पुन्हा एकदा झपाट्याने पसरत आहे. लॉकडाऊनंतर कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले. लोकांना मात्र काही गोष्टींचा विसर पडल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. बंगळूरमध्येही असाच एक प्रकार समोर येत आहे. एका पार्टिच्या निमित्ताने इमारतीतील रहिवाशी एकत्र आले होते. पार्टी अगदी उत्तम झाली मात्र ही पार्टी इमारतींच्या रहिवाश्यांना चांगलीच महागात पडली आहे. बंगळूरमधील एका बहुमजली इमारतीत राहणाऱ्या तब्बल १०० हून अधिक रहिवाश्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रहिवाश्यांनी उत्साहाच्या भरात केलेली पार्टीचे त्यांना असे परिणाम भोगावे लागतील असे त्यांना वाटलेही नव्हते.

बंगळूर येथील एसएनएन राज लेकव्ह्यू अपार्टमेंट कॉम्पेलेक्समधील रहिवाश्यांनी काही कारणास्तव ६ रोजी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत इमारतीतील ४५ जण उपस्थित होते. मात्र इमारतीतील १०० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. मंगळवारी १०३ रहिवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. इमारतीत काम करणारे ड्रायवर्स, घरकामाला येणाऱ्या बायका त्याचप्रमाणे स्वयंपाकासाठी येणाऱ्या मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

बीबीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या ४३५ फ्लॅटमध्ये एकूण १५ हजार रहिवाशी राहतात. त्यातील ५०० रहिवाशी पार्टीसाठी आले होते. १० फेब्रुवारीला पहिल्यांदा एका रहिवाशाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील बऱ्याच लोकांमध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले, असे बीबीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


हेही वाचा – Corona: अकोल्यात कोरोनाचा कहर; १५४ नव्या रुग्णांमध्ये वाढ, पुन्हा ‘हे’ कडक निर्बंध लागू!

- Advertisement -

 

 

- Advertisement -