घरताज्या घडामोडीएकतर्फी प्रेमातून महिलेने केला २४ वर्षीय व्यक्तीवर Acid हल्ला

एकतर्फी प्रेमातून महिलेने केला २४ वर्षीय व्यक्तीवर Acid हल्ला

Subscribe

आतापर्यंत मुलींवर Acid हल्ला करण्यात येत होता. मात्र उन्नाव येथे एका मुलीने तिला त्रास देणाऱ्या मुलावर Acid हल्ला केला आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नावमधील एका महिलेने मंगळवारी सकाळच्या सुमारास मारहाण केल्याचा आरोप करत एका २४ वर्षीय व्यक्तीवर Acid हल्ला केला आहे. मोरवान पोलिस ठाण्यातंर्गत गोदामाऊ गावाच्या परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पीडित व्यक्तीचे शरीर मोठ्याप्रमाणावर भाजले गेले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर पोलिसांनी त्याला पुढील उपचारांकरीता लखनऊ येथील रुग्णालयात पाठवले.

एकतर्फी प्रेमातून हल्ला

पीडित तरूण रोहित यादव हा भवानीगंज गावात एका डेअरीमध्ये क्लिनर म्हणून काम करायचा. त्याच ठिकाणी महिलेने त्याच्यावर हल्ला केला. हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडल्याची माहिती मोरवण पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी (एसओ) राजेंद्र राजवत यांनी दिली. तसेच हल्ला झालेल्या तरुणाकडून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. जर कुणी तक्रार केली तर चौकशी करुन आम्ही हल्लेखोराला अटक करू, असे राजवत म्हणाले.

- Advertisement -

Acidची विक्री आणि वितरण नियंत्रणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

याच महिन्यात नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (National Crime Records Bureau – NCRB) ताज्या अहवालानुसार पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक Acid हल्ल्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने या महिन्याच्या सुरूवातीस Acid ची विक्री आणि वितरण नियंत्रित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याबाबत राज्य सरकारला जाब विचारला होता. मुख्य न्यायाधीश गोविंद माथूर आणि न्यायमूर्ती चंद्र धारी सिंग यांच्या खंडपीठाने १० जानेवारी रोजी (छन्व) फाऊंडेशनचे संचालक आशिष शुक्ला यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर हा आदेश दिला आहे. राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय गृह सचिव आणि वैद्यकीय आरोग्यासाठी केंद्रीय सचिव यांना न्यायालयाने प्रतिज्ञापत्र लवकरात लवकर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तसेच कोर्टाने प्रतिवादींना सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -