घरताज्या घडामोडीपरदेशातल्या २७६ भारतीयांना करोनाची लागण; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती!

परदेशातल्या २७६ भारतीयांना करोनाची लागण; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती!

Subscribe

परदेशात असलेल्या भारतीयांपैकी सर्वात जास्त करोनाग्रस्त इराणमध्ये असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी आज लोकसभेमध्ये दिली.

भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५२वर पोहोचली असून महाराष्ट्रात हा आकडा ५२वर आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात करोनासंदर्भात जनजागृती केली जात आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या इतकी कमी कशी काय राहिली? याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच आता परदेशात असलेल्या भारतीयांच्या बाबतीच धक्कादायक आकडेवारी खुद्द परराष्ट्र मंत्रालयानेच जारी केली आहे. या आकडेवारीनुसार परदेशात असलेल्या एकूण भारतीयांपैकी २७६ भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, यातले २५५ भारतीय इराणमध्ये आहेत. बुधवारी लोकसभेमध्ये यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

परदेशात असलेल्या करोनाग्रस्त भारतीयांची आकडेवारीच यावेळी परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी जाहीर केली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण इराणमध्ये असून त्यांची संख्या २५५ आहे. त्याखालोखाल संयुक्त अरब अमिरात (१२ रुग्ण), इटली (५ रुग्ण), हाँगकाँग (१ रुग्ण), कुवैत (१ रुग्ण), रवांडा (१ रुग्ण) आणि श्रीलंका (१ रुग्ण) यांचा समावेश आहे.

रुग्णांची आकडेवारी व्हायरल

दरम्यान, याविषयीची माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव दम्मू रवी यांनी त्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ‘इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाचा फैलाव झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये करोनाचे पॉजिटिव्ह रुग्ण सापडणं हे शक्य आहे. पण २५० हून अधिक रुग्ण इराणमध्ये आहेत किंवा नाही, याविषयी मात्र खात्रीशीर माहिती अद्याप आलेली नाही. पण रुग्णांची अशी आकडेवारी देणारी यादी सध्या फिरत असल्याचं मात्र कानावर आलं आहे. सध्या इराणमधले भारतीय राजदूत तिथल्या भारतीय रुग्णांवर लक्ष केंद्रीत करून असून त्यांच्या उपचारांची आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -