घरताज्या घडामोडीविशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत विषारी वायूची गळती

विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत विषारी वायूची गळती

Subscribe

विशाखापट्टणममध्ये विषारी वायूची गळती झाल्याने ३ जणांचा मत्यू झाला आहे. पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली आहे.

आंध्र प्रदेशातील एलजी पॉलिमर उद्योगात केमिकल गॅस गळतीमुळे ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये एक लहान मूलही आहे. ही घटना विशाखापट्टणममधील आरआर वेंकटापुरम गावची आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता गॅस गळतीला सुरूवात झाली. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून उर्वरित लोकांना रुग्णालयात नेलं जात आहे. डोळ्यांना जळजळ आणि श्वास लागणे याबद्दल लोक तक्रारी करत आहेत. घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका उपस्थित आहेत.

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात लोकांना डोळ्यांमध्ये जळजळ होत असून श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांनी या ठिकाणापासून दूर जायला सुरुवात केली आहे. काही जण हा वायू नाकावाटे शरिरात गेल्याने बेशुद्ध झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये किती कामगार अडकले याबाबत सरकार अनभिज्ञ


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी एलजी पॉलिमर्स कंपनीत झालेल्या या गॅस गळतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -