घरदेश-विदेश३०० मुलांना विकले अमेरिकेत, मास्टरमाईंटला अटक

३०० मुलांना विकले अमेरिकेत, मास्टरमाईंटला अटक

Subscribe

अभिनेत्री प्रिती सूदने या आधी हे प्रकरण मार्चमध्ये उघडकीस आणले होते. त्यानंतर पोलिसांनी या संदर्भातील शोध सुरु केला होता. आणि त्या चौघांना अटक करण्यात आली. ज्यात पोलीस उपनिरिक्षकाचा मुलगा आमीर खान देखील होता.

महाराष्ट्रातील तब्बल ३०० मुलांना अमेरिकेत विकण्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. मुलांची तस्करी करणाऱ्या गुजरात स्थित मास्टरमाईंटला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राजूभाई गमलेवाला असे या मास्टरमाईंटचे नाव आहे. एका मुलाला भारतातून अमेरिकेत पाठवण्यासाठी ४५ लाख रुपये तो घेत होता. आतापर्यंत त्याने विकलेल्या मुलांचे काय झाले या बाबतची कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही.

विकलेली मुले अल्पवयीन

तस्करी करण्यात आलेली मुले ही ११ ते १६ वर्षांची आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकण्यात आलेली मुले ही गरीब घरातील आहे. अनेकदा पैशांसाठी पालकच मुलांना विकतात. त्यामुळे या मुलांचा शोध घेणे कठीण आहे. गमलेवाला अमेरिकेतील क्लाएंटसाठी गुजरातमधल्या गरीब कुटुंबातील मुले विकण्यासाठी त्या कुटुंबाना सांगायचा. शिवाय ते अशा लहान मुलांचा शोध घ्यायचे ज्यांचे पासपोर्ट भाड्याने देण्यास तायर असायचे. पोलिसांना एक लहान मुलाचा पासपोर्ट मिळाला असून तो पासपोर्ट दुसऱ्या मुलाचा असून ज्या मुलाला विकले आहे त्या मुलाशी मिळता जुळता चेहरा त्या मुलाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

एमिग्रेशन कसे मिळायचे?

देशाबाहेर जाताना पासपोर्ट पुरेसा नसतो तर एमिग्रेशनवर सही मिळणे गरजेचे असते. असे असताना देखील देशातून खोटा पासपोर्ट घेऊन जाणाऱ्या लहान मुलांना एमिग्रेशन सर्टिफिकेट कसे मिळत होते. याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

मार्च महिन्यात झाले होते रॅकेट उघड

अभिनेत्री प्रिती सूदने या आधी हे प्रकरण मार्चमध्ये उघडकीस आणले होते. ती वर्सोवामधील ज्या सलूनमध्ये गेली होती. तिथे दोन अल्पनवयीन मुलींना मेकअपसाठी आणले होते. तिला ही गोष्ट खटकल्यानंतर तिने त्या माणसांकडे विचारणा केली. पण त्यांनी दिलेली उत्तरे तिला पटली नाहीत म्हणून तिने पोलिसांना बोलावले. पण पोलीस येईपर्यंत त्यातील एक मुलींना घेऊन पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी या संदर्भातील शोध सुरु केला होता. आणि त्या चौघांना अटक करण्यात आली. ज्यात पोलीस उपनिरिक्षकाचा मुलगा आमीर खान देखील होता. त्यावेळी आमीर सोबत ताजुद्दीन खान, अफजल शेख, रिजवान चोटानी यांना अटक केली होती.

- Advertisement -

गमलेवालाला आधीही अटक

मुलांच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी गमलेवाला याला २००७ साली सुद्धा पोलिसांनी पासपोर्टमधील गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. मार्चमध्ये हे नवं प्रकरण समोर आल्यानंतर आणि गमलेवाला यातील मुख्य आरोपी असल्याचे कळाल्यानंतर त्याला अटक करण्यास मदत झाली. आता २८ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -