कोरोनाचा उद्रेक; देशात जुलै महिन्यात ११ लाख रुग्णांची नोंद

जुलै महिन्यात भारतात ११.१ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १९ हजार १२२ जणांनाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

corona
कोरोना विषाणू

जगात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारीही देशात कोरोनाचा अक्षरश: विस्फोट झाल्याचे बघायला मिळाले आहे. शुक्रवारी पहिल्यांदाच ५५ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली. तर, ७७९ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान, केवळ जुलै महिन्यात भारतात ११.१ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १९ हजार १२२ जणांनाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतात जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्याच्या अखेरिस देशात कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखांच्या वर होती. तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील १.६ टक्क्यांनी वाढली आहे. जून महिन्याच्या अखेरीस कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही ११ हजार ९८८ इतकी होती. जुलै महिन्यात कोरोनाने इतका वेग पकडला की अखेरच्या १५ दिवसांमध्ये तब्बल ७.३ लाख रुग्णांची नोंद करण्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट असल्याचे समोर आले आहे.

१८ देशांत बाधितांचा आकडा २ लाखांवर

जगातील १८ देशांमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २ लाखांच्या पार गेली आहे. यामध्ये इराण, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया, इटली, जर्मनी आणि बांगलादेशचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक संक्रमित रूग्ण संख्येत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर मृत्यू झालेल्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा – Corona Vaccine : सर्वात पहिली लस कोणाला?; विविध देशांमध्ये शोध सुरू